पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

गुजरातच्या अहमदाबादमध्ये झालेल्या अपघातातील जीवितहानीबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त


पंतप्रधानांनी पीएमएनआरएफमधून जाहीर केली सानुग्रह मदत

प्रविष्टि तिथि: 18 JUL 2026 7:13PM by PIB Mumbai

 

गुजरातच्या अहमदाबाद येथील फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या दुर्घटनेमधील जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी दुःख व्यक्त केले. मोदी म्हणाले की स्थानिक प्रशासन पीडितांना सर्वतोपरी मदत करत आहे.

मोदी यांनी पीएमएनआरएफतर्फे प्रत्येक मृताच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपयांची आणि जखमींना 50,000 रुपयांची सानुग्रह मदत जाहीर केली.

पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:

गुजरातच्या अहमदाबाद येथील फटाक्यांच्या कारखान्यातील अपघातात जीवितहानी झाल्याचे ऐकून अत्यंत दुःख झाले. या दुःखद प्रसंगी माझ्या संवेदना शोकाकुल कुटुंबांसोबत आहेत. जखमींच्या शीघ्र आरोग्यासाठी प्रार्थना. स्थानिक प्रशासन पीडितांना सर्वतोपरी मदत करत आहे.

प्रत्येक मृताच्या कुटुंबीयांना पीएमएनआरएफकडून 2 लाख रुपयांची सानुग्रह मदत दिली जाईल. जखमींना 50,000 रुपये दिले जातील: पंतप्रधान @narendramodi

***

राधिका अघोर/नंदिनी मथुरे/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 2286175) आगंतुक पटल : 23
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Manipuri , Assamese , Gujarati , Tamil , Telugu , Malayalam