वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

व्यापार आणि गुंतवणूक कायदा केंद्रातर्फे, भारतीय एमएसएमईच्या जागतिक बाजारातील विस्तारीकरणासाठी मार्गदर्शक पुस्तिका जाहीर

प्रविष्टि तिथि: 16 JUL 2026 8:15PM by PIB Mumbai

 

व्यापार आणि गुंतवणूक कायदा केंद्र, भारतीय परदेशी व्यापार संस्था आणि भारतीय उद्योग महासंघ यांच्या सहकार्याने आज नवी दिल्ली इथे ‘गोइंग ग्लोबल : अ प्रॅक्टिकल गाईड फॉर इंडियन एमएसएमईज’ या मार्गदर्शक पुस्तिकेचे प्रकाशन झाले.

सीआयआयच्या प्रतिनिधींनी यावेळी मार्गदर्शक पुस्तिकेचा आढावा सादर केला. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगाना निर्यातीच्या संधी ओळखणे, बाजारपेठेत प्रवेशासाठी आवश्यक अटी समजून घेणे, विनामूल्य उपलब्ध व्यापारविषयक माहिती साधनांचा प्रभावी वापर करणे, आंतरराष्ट्रीय मानके व शाश्वततेशी संबंधित आवश्यकतांचे पालन करणे तसेच निर्यातीसाठी आवश्यक सज्जता विकसित करणे यासाठी ‘वन-स्टॉप’ व्यावहारिक मार्गदर्शक म्हणून ही पुस्तिका तयार करण्यात आली आहे.

या मार्गदर्शक पुस्तिकेत एमएसएमई क्षेत्राला भेडसावणाऱ्या प्रमुख अडचणींवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. यामध्ये बाजारपेठेविषयी मर्यादित माहिती, परदेशातील खरेदीदारांविषयी अपुरी माहिती, आंतरराष्ट्रीय मानके आणि प्रमाणपत्रांच्या आवश्यकतांचे पालन करताना येणाऱ्या अडचणी तसेच किमतीतील स्पर्धात्मकता टिकवून ठेवण्याची आव्हाने यांचा समावेश आहे.

बाजारपेठेचे विश्लेषण सुलभ करून, मानके आणि प्रमाणपत्रांच्या आवश्यकता स्पष्ट करणे, संभाव्य खरेदीदार ओळखण्यासाठी मार्गदर्शन करून आणि बाजार संशोधनाचा खर्च कमी करणाऱ्या विश्वासार्ह आणि विनामूल्य उपलब्ध साधनांची माहिती देऊन, ही पुस्तिका एमएसएमईंसाठी एक व्यावहारिक मार्गदर्शक उपलब्ध करून देते. या प्रकाशनाचा उद्देश, एमएसएमईंना माहितीपूर्ण व्यावसायिक निर्णय घेण्यास सक्षम करणे आणि आंतरराष्ट्रीय व्यापारात त्यांचा अधिक प्रभावी सहभाग सुनिश्चित करणे हा आहे.

मार्गदर्शक पुस्तिकेच्या प्रकाशनानंतर एका चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. या चर्चेत भारताच्या मुक्त व्यापार करारांअंतर्गत उपलब्ध असलेल्या प्राधान्यप्राप्त मूळ-उत्पत्ती नियमांचा आणि सहकार्य यंत्रणांचा प्रभावी वापर करून भारतीय एमएसएमईंना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विस्तार करण्याच्या संधींचा आढावा घेण्यात आला.

याशिवाय, संभाव्य निर्यात बाजारपेठांची ओळख कशी करावी, आंतरराष्ट्रीय मानके आणि प्रमाणपत्रांच्या आवश्यकतांची पूर्तता कशी करावी, जागतिक मागणी लक्षात घेऊन उत्पादनांचे योग्य स्थान कसे निश्चित करावे  तसंच विविधीकरण आणि मूल्यवर्धन यांच्या माध्यमातून स्पर्धात्मकता कशी वाढवावी, याबाबतही पॅनेल सदस्यांनी सविस्तर चर्चा केली.

या कार्यक्रमात धोरणकर्ते, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी, व्यापारतज्ज्ञ आणि एमएसएमई क्षेत्राशी संबंधित भागधारक एकत्र आले. भारतीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या जागतिक स्पर्धात्मकतेत वाढ करण्यासाठी आवश्यक व्यावहारिक धोरणांवर त्यांनी सखोल चर्चा केली.

कार्यक्रमाची सांगता प्रश्नोत्तर सत्राने झाली. या सत्रामुळे सहभागी प्रतिनिधींना निर्यातीसाठीची सज्जता, आंतरराष्ट्रीय मानके व नियमांचे पालन आणि जागतिक बाजारपेठेत प्रवेश  यांसारख्या व्यावहारिक बाबींवर धोरणकर्ते आणि उद्योगतज्ज्ञांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळाली.

***

निलिमा चितळे/राधिका अघोर/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2285576) आगंतुक पटल : 16
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Tamil