वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारत आणि फिनलंड यांच्यातील व्यापार आणि गुंतवणूकविषयक बंध अधिक मजबूत करण्यासाठी केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य मंत्री, पीयूष गोयल यांच्या नेतृत्वाखाली, उच्चस्तरीय भारतीय शिष्टमंडळाचा फिनलंड दौरा


भारत आणि फिनलंड यांच्यातील उद्योग सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी दोन सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या

Posted On: 16 JUL 2026 6:59PM by PIB Mumbai

 

केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य मंत्री, पीयूष गोयल यांच्या नेतृत्वाखाली, उच्चस्तरीय शिष्टमंडळ फिनलंडच्या अधिकृत दौऱ्यावर गेले असून, या शिष्टमंडळात, उद्योगक्षेत्रातील दिग्गज आणि सरकारी अधिकाऱ्यांचा समावेश आहे. भारत आणि फिनलंड यांच्यातील द्विपक्षीय व्यापार , गुंतवणूक आणि उद्योग सहकार्य अधिक मजबूत करणे, या या दौऱ्याचा मुख्य उद्देश आहे. याच दौऱ्यात, दोन सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या,मंत्री स्तरीय चर्चा आणि भारत तसेच फिनलंडमधील विविध उद्योग क्षेत्रात अनेक वाटाघाटी आणि बैठका झाल्या.

मार्च 2026 मध्ये फिनलंडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांच्या भारत दौऱ्यादरम्यान भारत– फिनलंड यांच्यातील डिजिटलायझेशन आणि शाश्वतता क्षेत्रातील भागीदारी धोरणात्मक स्तरावर नेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच, 27 जानेवारी 2026 रोजी भारत–युरोपीय महासंघ मुक्त व्यापार करार पूर्ण झाल्यानंतरच्या गोयल यांच्या या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

आपल्या भेटीच्या पहिल्या दिवशी, गोयल यांनी, फिनलंडचे वित्तीय व्यवहार मंत्री,  डॉ. साकरी पुइस्तो यांच्याशी द्वीपक्षीय चर्चा केली. या चर्चेत, दोन्ही देशांतील वित्तीय बाजारपेठामधील सहकार्य वाढवणे, नवोन्मेष, आस्थापना वित्तपुरवठा आणि द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक विस्तारावर भर देण्यात आला.

त्याशिवाय, गोयल यांनी हेलसिंकी इथे हाऊस ऑफ इस्टेट्स मध्ये झालेल्या भारत- फिनलंड व्यापार मंचालाही संबोधित केले. या मंचावर, डॉ. साकरी पुइस्तो आणि पीयूष गोयल यांची प्रमुख भाषणे झाली. त्यानंतर, यानंतर सीआयआय व्यापार धोरण परिषदेचे अध्यक्ष नारायण सेतुरामन आणि बिझनेस फिनलंडचे महासंचालक लस्सी नोपोनेन यांनी आपले विचार मांडले.

या व्यापार मंचादरम्यान, सीआयआय म्हणजेच भारतीय उद्योग महासंघ आणि बिझनेस फिनलंड यांच्यात तसेच, सीएआयआय आणि फिनिश उद्योग महासंघ यांच्यात , अशा दोन सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. दोन्ही देशातील उद्योग सहकार्य वाढवणे आणि अधिक व्यापक व्यावसायिक संबंध विकसित करण्याच्या दृष्टीने, या सामंजस्य करारातून एक नवी संस्थात्मक यंत्रणा तयार करण्यास प्रोत्साहन मिळेल.

यावेळी, भारतीय आणि फिनिश कंपन्या, क्षेत्र-विशिष्ट चर्चामध्ये सहभागी झाल्या होत्या. ज्यात, डिजिटल आणि इतर आघाडीची तंत्रज्ञाने, अंतराळ, स्वच्छ ऊर्जा, जैव अर्थव्यवस्था, चक्राकार अर्थव्यवस्था, पायाभूत सुविधा आणि अत्याधुनिक उत्पादन क्षमता अशा क्षेत्रात परस्पर सहकार्य वाढवण्यासाठीच्या संधीचा शोध घेणे. गुंतवणूक आणि तंत्रज्ञान भागीदारी वाढवणे, यावर भर देण्यात आला.

2030 पर्यंत भारत–फिनलंड द्विपक्षीय व्यापार दुप्पट करण्याच्या दोन्ही देशांच्या समान महत्त्वाकांक्षेवर यावेळी पीयूष गोयल यांनी भर दिला. तसेच, भारत–युरोपीय महासंघ मुक्त व्यापार करारामुळे व्यापार, गुंतवणूक, उत्पादन आणि नवोन्मेष  क्षेत्रांतील भागीदारी विस्तारण्यासाठी निर्माण झालेल्या नव्या संधींवर त्यांनी प्रकाश टाकला.

या पहिल्या दिवशीच्या कार्यक्रमांची सांगता, हेलसिंकी इथल्या भारतीय दूतावासाने आयोजित केलेल्या स्वागत समारंभाने झाली. या समारंभात,  दोन्ही देशांतील उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी, धोरणकर्ते आणि इतर संबंधित भागधारकांना परस्पर संस्थात्मक तसेच व्यावसायिक संबंध अधिक दृढ करण्याची संधी मिळाली.

दौऱ्याच्या पहिल्या दिवसातील या कार्यक्रमांमधून भारत–फिनलंड आर्थिक संबंध वेगाने दृढ होत असल्याचे  अधोरेखित झाले असून, लवचिक, नवोन्मेष-धिष्ठित आणि भविष्याभिमुख भागीदारी उभारण्यासाठी दोन्ही देशांची कटिबद्धता, यातून पुन्हा एकदा स्पष्ट झाली.

***

निलिमा चितळे/राधिका अघोर/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2285569) अभ्यागत कक्ष : 52