रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेअंतर्गत महाराष्ट्रात नागपूर इथे पार पडलेल्या ब्रिक्स परिवहन मंत्र्यांच्या तिसऱ्या बैठकीत परिवहन मंत्र्यांनी स्विकारला मंत्रीस्तरीय जाहीरनामा

प्रविष्टि तिथि: 12 JUL 2026 5:40PM by PIB Mumbai


ब्रिक्सच्या यावर्षीच्या अर्थात 2026 भारताच्या अध्यक्षपदाअंतर्गत, महाराष्ट्रात नागपूर इथे  ब्रिक्स परिवहन मंत्र्यांची तिसरी बैठक आज संपन्न झाली. ही बैठक ब्रिक्स सदस्य देशांमधील परिवहन सहकार्य अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरली आहे. 11 जुलै 2026 रोजी झालेल्या या मंत्रीस्तरीय बैठकीपूर्वी, 9 आणि 10 जुलै 2026 रोजी तिसरी ब्रिक्स परिवहन कार्यगटाच्या  वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी परिवहन मंत्र्यांच्या मंजुरीसाठीची कार्यक्रमपत्रिका आणि मंत्रीस्तरीय जाहीरनाम्याला अंतिम स्वरुप दिले होते.

आज या बैठकीत मंत्रीस्तरीय जाहीरनामा एकमताने मंजूर झाला, आणि या बैठकीचा समारोप झाला. या जाहीरनाम्यात पायाभूत सुविधांमधील चक्रीयता , शाश्वत विमान इंधन, परिवहन व्यवस्था कार्बन उत्सर्जनमुक्त करणे, शहरी गतिशीलता  केंद्र, रसद व्यवस्थापन (लॉजिस्टिक्स) पुरवठा साखळीला सहकार्य आणि ब्रिक्स रेल्वे संशोधन व्यवस्था या क्षेत्रांतील परस्पर सहकार्यासाठी, परस्पर सामायिक विचाराअंती तयार केलेला आराखडा मांडण्यात आला आहे.

सर्वांची सहमती आणि सहभागपूर्ण दृष्टिकोनामुळे, परिवहन मंत्री आणि शिष्टमंडळाच्या प्रमुखांना या जाहीरनाम्यावर एकमत घडवून आणणे शक्य झाले. या जाहीरनाम्यात प्राधान्यक्रमाच्या सर्व क्षेत्रांशी संबंधीत सामूहिक वचनबद्धतेचा अंतर्भाव आहे. या जाहीरनामा निमीत्त झालेली चर्चा परस्पर आदर, समानता आणि सर्वसहमती या ब्रिक्सच्या भावनेची प्रचिती करून देणारी ठरली.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी, या बैठकीसाठी आलेल्या शिष्टमंडळातील प्रत्येक सदस्याने केलेल्या सहकार्याबद्दल  आणि मंत्रीस्तरीय बैठकीच्या यशस्वी फलनिष्पत्तीबद्दल सर्वांचे आभार मानले.

या बैठकीत भारताच्या वतीने सर्व ब्रिक्स सदस्य देशांनी दिलेल्या उपयुक्त सहभागाबद्दल आणि मौल्यवान योगदानाबद्दल, कृतज्ञता व्यक्त करण्यात आली . या सगळ्यांच्या सामूहिक प्रयत्नांमुळेच ही बैठक यशस्वीपणे संपन्न झाल्याची भावना भारताच्या वतीने व्यक्त करण्यात आली. यासोबतच, ज्या देशाकडे यापुढचे ब्रिक्स अध्यक्षद असेल, त्यांच्याकडे या उपक्रमांचे सुरळीत हस्तांतरण होईल याची सुनिश्चिती करण्याबद्दलची वचनबद्धताही भारताने पुन्हा एकदा व्यक्त केली.

या बैठकीच्या निमित्ताने ब्रिक्सच्या सदस्य देशांचे परिवहन मंत्री, वरिष्ठ अधिकारी आणि तंत्रज्ञान क्षेत्रातले तज्ञ एकत्र आले होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक, परिवहन मंत्र्यांची बैठक आणि द्विपक्षीय चर्चा अशा विविध उपक्रमाचे या चार दिवसांमध्ये आयोजन केले गेले. या आयोजनाअंतर्गत ब्रिक्स देशांमधील समृद्ध विविधतेचे दर्शन घडवणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचेही सादरीकरण करण्यात आले. या उपक्रमाच्या माध्यमातून सहभागी शिष्टमंडळांमध्ये परस्पर सामंजस्य दृढ करण्यासाठी, सदस्य देशांच्या नागरिकांमधील परस्पर संबंध वृद्धिंगत करण्यासाठी, तसेच परस्पर आणि संस्थात्मक संबंधांना बळकटी देण्यासाठीचे एक महत्वपूर्ण व्यासपीठ उपलब्ध झाले.

***

सुषमा काणे/तुषार पवार/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 2283922) आगंतुक पटल : 32
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Gujarati , Tamil , Malayalam