सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

नशा मुक्त भारत अभियानच्या 6 व्या वर्धापन दिनानिमित्त 18 ऑगस्ट 2026 रोजी देशात अंमली पदार्थ विरोधी राष्ट्रीय प्रतिज्ञा घेण्यात येणार, 12 कोटींहून अधिक नागरिक सहभागी होण्याची शक्यता

प्रविष्टि तिथि: 10 JUL 2026 7:56PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 10 जुलै 2026

 

नशा मुक्त भारत अभियान च्या 6 व्या वर्धापन दिनानिमित्त, केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने 18 ऑगस्ट 2026 रोजी अंमली पदार्थ विरोधी राष्ट्रीय सामूहिक प्रतिज्ञा घेण्याचे जाहीर केले आहे. प्रत्यक्ष आणि ऑनलाइन अशा दोन्ही माध्यमांतून 12 कोटींहून अधिक नागरिकांना यात सहभागी करून घेण्याचे मंत्रालयाचे उद्दिष्ट आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी या प्रतिज्ञा कार्यक्रमाचे नेतृत्व करतील अशी शक्यता आहे.

राजधानीत अंमली पदार्थ प्रतिबंधक विभागाचे सहसचिव डॉ. संदीप रेवाजी राठोड यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्च-स्तरीय समन्वय बैठक आयोजित करण्यात आली होती.

नशा मुक्त भारत अभियानच्या उद्दिष्टांनुसार, निर्धारित संख्येनुसार देशभरातील नागरिकांचा या प्रतिज्ञा कार्यक्रमात प्रत्यक्ष आणि ऑनलाइन माध्यमातून सहभाग निश्चित करण्यासाठीच्या योजनेवर आणि सर्वसमावेशक धोरणावर या बैठकीत चर्चा करण्यात आली.

संबंधित मंत्रालये आणि विभागांच्या अखत्यारीतील सर्व संलग्न कार्यालये, शैक्षणिक संस्था, स्वायत्त संस्था, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि क्षेत्रीय कार्यालयांमध्ये प्रतिज्ञा समारंभ आयोजित करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. एनएमबीए प्रतिज्ञा हा अंमली पदार्थांच्या व्यसनाचे बळी ठरलेल्यांपर्यंत पोहोचण्यासाठी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेण्याचा एक उपक्रम आहे.

तसेच, हेल्पलाइन क्रमांक 14446 द्वारे व्यसनमुक्तीला प्रोत्साहन आणि चालना देणाऱ्या महत्त्वपूर्ण संदेशावर लक्ष केंद्रित करण्यावरही या बैठकीत भर देण्यात आला.

देशातील अंमली पदार्थांच्या मागणीला आळा घालण्यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने 15 ऑगस्ट 2020 रोजी नशा मुक्त भारत अभियान (एनएमबीए) सुरू केले.

आजवर, एनएमबीए चा विस्तार देशभरात झाला असून त्याद्वारे 29.26 कोटींहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्यात यश आले आहे; यात 11.17 कोटींहून अधिक तरुण आणि 7.90 कोटी महिलांचा समावेश आहे. तसेच, 28.30 लाख व्यक्तींवर उपचार आणि त्यांचे पुनर्वसन करण्यात आले असून, देशभरातील 21.34 लाख शैक्षणिक संस्थांमध्ये जनजागृती व संपर्क उपक्रम राबवले आहेत आणि ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांनी म्हटले आहे की, 'नशा मुक्त भारत अभियान' हा राष्ट्र उभारणीचा एक प्रमुख उपक्रम आहे, जो निरोगी आणि शिस्तप्रिय तरुणांवर लक्ष केंद्रित करतो.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटले की, नशा मुक्त भारत अभियान ही अंमली पदार्थांच्या व्यसनाविरोधात तथ्यावर आधारित दृष्टीकोनाला चालना देणारी एक प्रमुख मोहीम आहे.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री बी एल. वर्मा यांनी म्हटले की, या मोहिमेचा उद्देश प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचत अंमली पदार्थांच्या व्यसनामुळे होणाऱ्या धोक्यांविषयी जागरूकता निर्माण करणे हा आहे.

 

* * *

निलिमा चितळे/राजेश शिरभाते/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2283451) आगंतुक पटल : 14
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Gujarati , Tamil