पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निःस्वार्थ सेवेच्या भावनेचे महत्त्व सांगणारे संस्कृत सुभाषित केले सामायिक
प्रविष्टि तिथि:
10 JUL 2026 8:22AM by PIB Mumbai
निःस्वार्थ कृती ही मानवतेचे सर्वात मोठे सामर्थ्य असून याच निरपेक्ष सेवेच्या आणि समर्पण वृत्तीच्या बळावर राष्ट्र आपल्या प्रत्येक नागरिकाचे जीवन अधिक समृद्ध करण्यासाठी पुढे वाटचाल करत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
पंतप्रधानांनी एक संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे.
“हितं यत्सर्वभूतानामात्मानश्च सुखावहम्।
तत्कुर्यादीश्वरे ह्येतन्मूलं सर्वार्थसिद्धये।। ”
प्रत्येकाने केवळ असेच कार्य करावे की ज्यामुळे संपूर्ण सजीव सृष्टीला त्याचा लाभ होईल आणि प्रत्येक जीवाला शांततेची अनुभूती मिळेल, असे या सुभाषितात म्हटले आहे. यातून ईश्वराकडे व्यक्त केलेली संपूर्ण समर्पण भावना दिसत असून मानवाच्या सर्व कृतींचा आणि अध्यात्मिक साधनेचा तो मूलाधार आहे.
पंतप्रधानांनी 'एक्स' वरील पोस्ट मध्ये लिहिले आहे:
निस्वार्थ कृती ही मानवतेची सर्वात मोठी शक्ती आहे. आम्ही याच सेवा आणि समर्पणाच्या भावनेने, प्रत्येकाचे जीवन सुधारण्याच्या दृढनिश्चयाने पुढे वाटचाल करत आहोत.
हितं यत्सर्वभूतानामात्मानश्च सुखावहम् ।
तत्कुर्यादीश्वरे ह्येतन्मूलं सर्वार्थसिद्धये ।।”
***
NitinFulluke / BhaktiSontakke / DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2283228)
आगंतुक पटल : 5