भारतीय निवडणूक आयोग
azadi ka amrit mahotsav

भारत निवडणूक आयोगातर्फे माध्यम आणि संवाद अधिकाऱ्यांसाठी तिसऱ्या एकदिवसीय परिषदेचे आयोजन

प्रविष्टि तिथि: 08 JUL 2026 9:59PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 8 जुलै 2026

 

  1. भारत निवडणूक आयोगाने माध्यम आणि संवाद अधिकाऱ्यांसाठी तिसऱ्या एकदिवसीय परिषदेचे आयोजन केले होते. यामध्ये सहभागी राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या विविध जिल्ह्यांतले माध्यम समन्वय अधिकारी, समाज माध्यम समन्वय अधिकारी आणि राज्य जनसंपर्क विभागाचे वरिष्ठ अधिकारी एकत्र आले होते.
  2. यात 10 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमधले सुमारे 200 माध्यम आणि संवाद अधिकारी सहभागी झाले होते. त्यात माध्यम समन्वय अधिकारी आणि समाजमाध्यम समन्वय अधिकारी यांच्यासह जिल्हा माध्यम समन्वय अधिकारी/जिल्हा जनसंपर्क अधिकारी आणि संबंधित राज्य जनसंपर्क विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
  3. परिषदेदरम्यान मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त डॉ. विवेक जोशी यांनी उपस्थितांना संबोधित केले.
  4. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी, आयोगाची प्रत्येक कारवाई भारताचे संविधान, निवडणूक कायदे आणि वेळोवेळी पारदर्शक पद्धतीने जारी केलेल्या लेखी सूचनांवर आधारित असते, असे सांगितले. समाजमाध्यमांवरून माहिती बद्दल अधिकाऱ्यांना सावध करताना मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार म्हणाले की, दिशाभूल करणारी माहिती पसरण्यापासून रोखण्यासाठी अधिकाऱ्यांनी सक्रियपणे काम करण्याची गरज आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमधली आतापर्यंतची सर्वाधिक मतदानाची टक्केवारी हा भारतीय मतदारांचा देशाच्या निवडणूक प्रणालीवरील विश्वासाचा पुरावा आहे, असे त्यांनी सांगितले.
  5. उपस्थितांना संबोधित करताना निवडणूक आयुक्त डॉ. विवेक जोशी म्हणाले की, आजच्या डिजिटल जगात, संस्थांवरचा विश्वास कमी करण्यासाठी स्वार्थी घटकांकडून दिशाभूल करण्याच्या उद्देशाने एआय, डीपफेक, कृत्रिम आणि खोडसाळ मजकूर पसरवला जातो. डॉ. जोशी यांनी माध्यम आणि संवाद अधिकाऱ्यांना आयोगाचे नियम, सूचना आणि मार्गदर्शक तत्त्वांच्या आधारे असे प्रयत्न हाणून पाडण्याचे आवाहन केले.
  6. परिषदेची सुरुवात संपूर्ण निवडणूक चक्रातल्या संवाद धोरणांच्या विस्तृत आढाव्याने झाली. यात मतदार यादी तयार करण्यापासून ते मतदानापर्यंत , ECINET हे पोर्टल, महत्त्वाच्या घटनात्मक तरतुदी आणि प्रसारमाध्यमांशी संबंधित कायदे यांचा समावेश होता.
  7. प्रेस नोट्सचे नियोजन करणे आणि माध्यम आणि समाजमाध्यमांद्वारे त्यांचा प्रसार, चुकीची माहिती आणि बातम्यांचा सामना करणे, ईएलसी (ELCs) द्वारे तरुण मतदारांना जोडणे आणि निवडणूक आयोगाच्या उपक्रमांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवणे या विषयांवर प्रात्यक्षिक सत्रांचेही आयोजन करण्यात आले होते.
  8. कार्यक्रमाचा एक भाग म्हणून, सहभागींना गटांमध्ये मतदार यादी तयार करणे, मतदान प्रक्रिया आणि मतमोजणी प्रक्रिया यांचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. त्यानंतर त्यांनी प्रदर्शन आणि मीडिया कॉर्नरची पाहणी केली.
  9. या सत्रांनंतर सहभागी अधिकारी आणि आयोग यांच्यात प्रश्नोत्तरांचे सत्रही पार पडले.

 

* * *

शैलेश पाटील/निखिलेश चित्रे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2282659) आगंतुक पटल : 12
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Gujarati , Tamil , Malayalam