लोकसभा सचिवालय
भारताची नागरी संस्कृतीविषयक मूल्ये आजही मानवजातीला मार्गदर्शन करत आहेत : लोकसभा अध्यक्ष
प्रविष्टि तिथि:
07 JUL 2026 8:12PM by PIB Mumbai
नवी दिल्ली,7 जुलै 2026
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज सांगितले की भारताची नागरी संस्कृतीविषयक मूल्ये मानवजातीला आजही मार्गदर्शन करत असून शांतता, सलोखा तसेच नैतिक जीवनशैलीला चालना देण्यासाठी समर्पक ठरत आहेत. ओम बिर्ला म्हणाले की भारत ही अध्यात्मिकता, योग, धर्म आणि संस्कृती यांच्या प्राचीन परंपरांची भूमी आहे. ते पुढे म्हणाले की, योगाभ्यासाची परंपरा आणि संतांनी संपूर्ण जगाला निरोगी जीवनशैली, नैतिकता तसेच अध्यात्मिक जाणीवेचा संदेश दिला आहे.
रघुवंशपुरम आश्रमातील अर्धनारीश्वर मंदिरात आयोजित प्राणप्रतिष्ठा महोत्सव आणि श्रीराम कथा या कार्यक्रमानिमित्त ते उपस्थितांना संबोधित करत होते.
याप्रसंगी बिर्ला म्हणाले की, प्राणप्रतिष्ठा महोत्सव म्हणजे भारताच्या अध्यात्मिक परंपरा, संत-संस्कृती तसेच सार्वजनिक कल्याणाप्रती असलेल्या बांधिलकीचा एक प्रेरणादायक उत्सव आहे.
भगवान अर्धनारीश्वर यांची प्राणप्रतिष्ठा हा केवळ एक धार्मिक सोहळा नव्हे तर तो श्रद्धा बळकट करणारा, मूल्यांची पुनर्स्थापना करणारा आणि अध्यात्मिक जाणीव निर्माण करणारा एक पवित्र प्रसंग आहे हे त्यांनी नमूद केले. असे सोहळे समाजाला त्याच्या सांस्कृतिक मुळांशी जोडून ठेवतात आणि राष्ट्र उभारणीमध्ये सामुहिक सहभागाला प्रेरणा देतात असे निरीक्षण ओम बिर्ला यांनी नोंदवले.
मंदिरे ही श्रद्धेची केंद्रे असण्यासोबतच सत्य, नीतिमत्ता, मूल्ये, सेवा आणि सामाजिक सलोखा यांना चालना देणाऱ्या संस्था देखील आहेत असे निरीक्षण नोंदवत ओम बिर्ला म्हणाले की भारताचा सांकृतिक वारसा जतन करण्यात आणि समाजाची नैतिक वीण बळकट करण्यात मंदिरे महत्त्वाची भूमिका बजावतात. ते पुढे म्हणाले की मंदिरे ऐतिहासिक काळापासून ‘वसुधैव कुटुंबकम’ची भावना जोपासत, शिक्षण, दानधर्म तसेच समाज कल्याणाची केंद्रे म्हणून कार्य करत आली आहेत.
भगवान अर्धनारीश्वर यांचे महत्त्व सांगताना ओम बिर्ला म्हणाले की हे दिव्य स्वरूप शिव आणि शक्ती, पुरुष आणि प्रकृती यांच्यातील सुसंवादी समतोलाचे प्रतीक आहे. ते पुढे म्हणाले की, भगवान शिव यांची सार्वत्रिक कल्याणाप्रती कटिबद्धता आणि देवी पार्वती यांची करुणा यांचे आदर्श समाजाला एक संतुलित, सुसंवादी आणि संवेदनशील जीवन जगण्याची प्रेरणा देतात. हा समतोल, निसर्ग आणि मानवता अशा दोन्हींचा आदर करण्याची शिकवण देतात आणि आपल्याला शाश्वत आणि समावेशक विकासासाठी मार्गदर्शन करतात.
सुषमा काणे/संजना चिटणीस/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2282236)
आगंतुक पटल : 16