पंतप्रधान कार्यालय
डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिला विशेष लेख
Posted On:
06 JUL 2026 4:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली,6 जुलै 2026
डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या जीवनकार्याविषयीची माहिती सांगणारे त्यांचे विचार, एका लेखाच्या माध्यमातून मांडले आहेत. या लेखात त्यांनी, एक शिक्षणतज्ञ, कुलगुरु, मंत्री आणि राजकीय नेता अशा विविध भूमिकांमधून डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी देशसेवेत दिलेले बहुआयामी योगदान विशद केले आहे. त्याशिवाय, भारताची एकता आणि राष्ट्रीय अखंडतेसाठी, मुखर्जी यांनी केलेल्या अद्वितीय प्रयत्नांनाही मोदी यांनी या लेखातून अधोरेखित केले आहे.
तसेच, 2019 मध्ये , कलम 370 आणि 35 ए हटवण्याचा निर्णय, आपले संपूर्ण आयुष्य, देशाची एकात्मता आणि अखंडतेसाठी समर्पित करणाऱ्या डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांना वाहिलेली सार्थ श्रद्धांजली होती, असेही मोदी यांनी या लेखात म्हटले आहे.
पंतप्रधानांनी एक्स वर लिहिले आहे:
“डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या जीवनकार्यावर एक विशेष लेख लिहिला आहे. यात त्यांच्या कुलगुरु, मंत्री, राजकीय नेते आणि इतर अनेक व्यासंग यांच्या विविधांगी पैलूंचा परिचय करून दिला आहे. भारताच्या अखंडतेसाठी त्यांनी केलेल्या असामान्य प्रयत्नांनाही या लेखात अधोरेखित केले आहे. 2019 साली, कलम 370 आणि 35 ए हटवणे, ही त्यांना देशाने दिलेली सार्थ श्रद्धांजली आहे.
आज देश, अखंड भारताचे प्रणेते, प्रखर राष्ट्रवादी,महान शिक्षण तज्ञ डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांची 125 वी जयंती साजरी करत आहे. सक्षम आणि आत्मनिर्भर भारतासाठीची त्यांची दूरदृष्टी आपल्या राष्ट्रउभारणीच्या संकल्पाला नवी ऊर्जा देत आहे. याप्रसंगा निमित्त, त्यांच्या अमूल्य योगदानाला समर्पित माझा हा लेख..
निलीमा चितळे/राधिका अघोर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2281660)
अभ्यागत कक्ष : 64
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Bengali-TR
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam