पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला


राष्ट्राध्यक्ष पेझेश्कियान यांनी पंतप्रधानांना पश्चिम आशियातील ताज्या घडामोडींची माहिती दिली

सामंजस्याचे पंतप्रधानांनी स्वागत केले आणि चिरस्थायी शांतता व स्थैर्यासाठी प्रयत्न सुरू ठेवण्याच्या गरजेचा पुनरुच्चार केला

Posted On: 30 JUN 2026 10:02PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 30 जून 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि  इराणचे राष्ट्राध्यक्ष डॉ. मसूद पेझेश्कियान यांच्यात आज दूरध्वनीवरून संवाद झाला.

राष्ट्राध्यक्ष पेझेश्कियान यांनी पंतप्रधानांना पश्चिम आशियातील अलीकडील घडामोडी आणि पुढील वाटचालीबद्दल माहिती दिली.

पंतप्रधानांनी सामंजस्याचे  स्वागत केले आणि सर्व प्रश्न संवाद व राजनैतिक मार्गानेच सोडवले पाहिजेत, या भारताच्या सातत्यपूर्ण भूमिकेचा पुनरुच्चार केला.

पंतप्रधानांनी प्रदेशात चिरस्थायी शांतता आणि स्थैर्य सुनिश्चित करण्यासाठी तसेच नौवहन आणि व्यापाराचे स्वातंत्र्य जपण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवण्याच्या गरजेचा पुनरुच्चार केला.

 

* * *

निलिमा चितळे/नंदिनी मथुरे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2279639) अभ्यागत कक्ष : 48