अर्थ मंत्रालय
भारत सरकारच्या खात्यांचा मे 2026 (आर्थिक वर्ष 2026-27) पर्यंतचा मासिक आढावा
Posted On:
30 JUN 2026 8:33PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 जून 2026
भारत सरकारच्या मे 2026 पर्यंतच्या मासिक खात्यांची माहिती संकलित करून, त्याचा एकत्रित अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्याची ठळक वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत :-
भारत सरकारला मे 2026च्या अखेरपर्यंत 7,18,669 कोटी रुपये इतक्या प्राप्ती झाली असून, ही रक्कम 2026-27 च्या एकूण प्राप्तीच्या अर्थसंकल्पीय अंदाजाच्या 19.7 टक्के आहे. यामध्ये केंद्राचा निव्वळ कर महसूल 3,48,138 कोटी रुपये, करेतर महसूल 3,50,867 कोटी रुपये आणि कर्जेतर भांडवली प्राप्ती 19,664 कोटी रुपये इतकी आहे. या कालावधीत भारत सरकारने राज्य सरकारांना करांतील त्यांच्या वाट्यापोटी 1,75,557 कोटी रुपये हस्तांतरण केले असून, ही रक्कम मागील वर्षाच्या तुलनेत 12,086 कोटींनी अधिक आहे.
भारत सरकारचा मे 2026 अखेरपर्यंतचा एकूण खर्च 8,81,023 कोटी रुपये इतका झाला असून, हा 2026-27 च्या संबंधित अर्थसंकल्पीय अंदाजाच्या 16.5 टक्के आहे. यापैकी 6,30,020 कोटी रुपये महसुली खात्यावर तर 2,51,003 कोटी रुपये भांडवली आहे.
एकूण महसुली खर्चापैकी 1,81,461 कोटी व्याज देयकांवर तर 75,542 कोटी रुपये प्रमुख अनुदानांवर खर्च करण्यात आले आहेत.
* * *
सुषमा काणे/राधिका अघोर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2279576)
अभ्यागत कक्ष : 65