शिक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य आणि उच्च शिक्षण संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या आत्महत्या प्रतिबंधाशी संबंधित राष्ट्रीय कृतीदलाने मे 2025 पासून 10 राज्यांमधील 30 उच्च शिक्षण संस्थांना भेटी दिल्या

प्रविष्टि तिथि: 30 JUN 2026 6:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 30 जून 2026

 

विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य आणि उच्च शिक्षण संस्थांमधील (एचईआय) विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्याशी संबंधित राष्ट्रीय कृतीदलाने (एनटीएफ), प्रादेशिक आणि संस्थात्मक संदर्भांमध्ये अधिक गहन सहभाग शक्य होण्यासाठी मे 2025 पासून 10 राज्यांमधील 30 उच्च शिक्षण संस्थांना क्षेत्र भेटी दिल्या. तसेच या कृतीदलाने आंतरशिस्तपालन आणि समता-केंद्रित दृष्टीकोन सुनिश्चित करण्यासाठी भागधारकांच्या 25 सल्लागार बैठका देखील घेतल्या. जानेवारी 2026 पासून एनटीएफने खालील संकल्पनांवर आधारित अतिरिक्त सल्लामसलती पूर्ण केल्या:

  • दिव्यांगत्व असलेले विद्यार्थी आणि शिक्षकवर्ग
  • उच्च शिक्षणातील जातीभेदभाव
  • लिंग, मानसिक आरोग्य आणि आत्महत्या
  • अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय समुदायाचे विद्यार्थी
  • मानसिक आरोग्य आणि आत्महत्येचे गुन्हेगारी स्वरूप रद्द करणे
  • उच्च शिक्षण स्तरावरील विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांमध्ये लिंगभावविषयक प्रश्न
  • मानसिक आरोग्य क्षेत्रात कार्यरत बिगर-सरकारी संस्थांशी सल्लामसलत
  • कायद्याचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांशी चर्चा

देशभरातील विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या वाढत्या घटना रोखणे आणि एचईआयज मधील विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य आणि स्वास्थ्यविषयक समस्यांची तपासणी करणे या उद्देशांसह सर्वोच्च न्यायालयाने दिनांक 24 मार्च 2025 रोजी एनटीएफची स्थापना केली.

एनटीएफचे मुख्य कार्यक्षेत्र तीन पदरी आहे:

  1. विद्यार्थ्यांना आत्महत्या करायला प्रवृत्त करणाऱ्या प्रमुख कारणांची निश्चिती
  2. संबंधित कायदे, धोरणे आणि संस्थात्मक चौकटींचे विश्लेषण; आणि
  3. अधिक सशक्त अंमलबजावणी, जबाबदारी तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना सुनिश्चित करण्यासाठी विद्यमान तफावती भरून काढण्यासाठीच्या शिफारसींसह विद्यमान कायदेशीर आणि संस्थात्मक आराखड्यांमध्ये आवश्यक सुधारणांचा प्रस्ताव मांडणे, अधिक समावेशक आणि पोषक शैक्षणिक वातावरणाची निर्मिती करणे तसेच वंचित समुदायांमधील सदस्यांसाठी समान संधी सुनिश्चित करणे

एनटीएफच्या अधिकृत संकेतस्थळावर (https://ntf.education.gov.in) ‘प्रसिद्धीपत्रके आणि घोषणा’ विभागांतर्गत खालील दस्तावेज उपलब्ध आहेत:

  • अंतरिम अहवाल (नोव्हेंबर 2025): हा अहवाल एनटीएफने कार्यक्षेत्राच्या पहिल्या टप्प्यादरम्यान हाती घेतलेल्या कामाची माहिती सांगतो.
  • सद्यस्थिती अहवाल (जुलै 2025 आणि मे 2026): एनटीएफच्या सद्यस्थिती अहवालात एनटीएफने हाती घेतलेल्या कामांची रूपरेषा स्पष्ट करण्यात आली असून त्यामध्ये संस्थात्मक क्षेत्र भेटींशी संबंधित अद्ययावत आकडेवारी, भागधारकांची चर्चा आणि उच्च शिक्षण संस्था, विद्यार्थी, पालक, शिक्षकवर्ग तसेच मानसिक आरोग्य क्षेत्रातील व्यावसायिक यांनी भरलेले ऑनलाइन सर्वेक्षण अहवाल यांचा समावेश आहे.
  • अंतरिम आदेश: अमित कुमार आणि इतर विरुद्ध भारत आणि इतर या प्रकरणी [2025चे फौजदारी अपील क्र. 1425] सर्वोच्च न्यायालयाने मंजूर केलेला अंतरिम आदेश देखील या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आलेला आहे.

 

* * *

निलिमा चितळे/संजना चिटणीस/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2279500) आगंतुक पटल : 8
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Bengali-TR , Gujarati , Tamil , Telugu , Malayalam