रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
महत्वाच्या पुलांच्या संरचनेच्या स्वतंत्र गुणवत्ता परीक्षण आणि पडताळणीसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आयआयटी आणि नामवंत तंत्रज्ञान संस्थांची घेणार मदत
सुमारे 12 आयआयटी आणि इतर आघाडीच्या संस्थांनी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणासोबत एकत्रित काम करण्याची दर्शवली तयारी
प्रविष्टि तिथि:
30 JUN 2026 5:53PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 जून 2026
राष्ट्रीय महामार्गांचे जाळे अधिक मजबूत दीर्घकाळ टिकणारे व्हावे आणि त्या रस्त्यांची सुरक्षितता तसेच गुणवत्ता बळकट करण्यासाठी, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) ने आयआयटी म्हणजेच, भारतीय तंत्रज्ञान संस्था आणि इतर नामवंत संस्थांसोबत एक उपक्रम हाती घेतला आहे. त्यानुसार, या संस्था, देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवर बांधल्या जाणाऱ्या नव्या पूलांची गुणवत्ता आणि संरचना, तपासण्यासाठी स्वतंत्र जलवैज्ञानिक अभ्यास आणि तपासणी करणार आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश, 100 वर्षे किंवा त्यापेक्षाही अधिक काळ इतके आयुष्य असलेल्या महत्वाच्या पुलांची बांधणी होण्यापूर्वीच, प्रत्येक पावलावर त्यांची कठोर स्वतंत्र तपासणी केली जावी, यासाठी सुमारे 12 आयआयटी संस्था, ज्यात, आयआयटी दिल्ली, आयआयटी मुंबई, आयआयटी रुरकी, आयआयटी खरगपूर आणि त्याशिवाय इतर अनेक आघाडीच्या संस्थांनी एनएचएआय सोबत हे काम करण्यास उत्सुक असल्याचे सांगितले आहे.
या उपक्रमामुळे, एनएचएआयला महत्वाच्या पुल प्रकल्पांच्या रचना पडताळणीसाठी एक देशव्यापी संस्थात्मक आराखडा विकसित करता येईल. या चौकटीमुळे गुणवत्ता हमीच्या प्रक्रियांना अधिक बळकटी मिळेल तसेच पूल प्रकल्पांच्या रचना आणि अंमलबजावणीची गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल. या उपक्रमांतर्गत संरचनात्मक रचनेचे मोजमाप, अभियांत्रिकी आराखडे, बांधकाम कार्यपद्धती, भू-तांत्रिक तपासण्या आणि जलवैज्ञानिक अभ्यास यांचे सखोल परीक्षण केले जाईल.
हाच आराखडा मग, सर्व प्रकल्पांना एकसमान पद्धतीने लागू केला जाईल. विविध ठिकाणी असलेल्या बांधकामांसाठी हाच आराखडा वापरला जाईल, जेणेकरुन, प्रत्येक प्रकल्पात, त्याच दर्जाची गुणवत्ता, वेगवेगळ्या प्रकारच्या कामांसाठी एकसमान पद्धत आणि गुणवत्तेचा दर्जा कायम राखला जाईल.
ह्या उपक्रमामुळे, बांधकामांची संरचनात्मक सुरक्षितता वाढेल, संरचनेची विश्वासार्हता वाढेल, त्याशिवाय, दीर्घकालीन कार्यात्मक धोकाही कमी होईल. हा उपक्रम, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या उच्च दर्जाच्या आणि भविष्यातील गरजांसाठी सक्षम अशा राष्ट्रीय महामार्ग जाळ्याच्या विकासासाठी सर्वोत्तम अभियांत्रिकी पद्धती आणि प्रभावी संस्थात्मक यंत्रणा अंगीकारण्याच्या व्यापक उद्दिष्टाशी सुसंगत आहे.
* * *
निलिमा चितळे/राधिका अघोर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2279465)
आगंतुक पटल : 24