आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी केले ‘आयुष्मान सारथी’ – पीएम-जेएवाय व्हॉट्सॲप चॅटबॉटचे उद्घाटन; व्हॉट्सॲपच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकापर्यंत आयुष्मान भारतच्या सेवा पोहोचविण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल

प्रविष्टि तिथि: 29 JUN 2026 8:51PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 29 जून 2026

 

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी आज ‘आयुष्मान सारथी – पीएम-जेएवाय व्हॉट्सॲप चॅटबॉट’चे उद्घाटन केले. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयांतर्गत कार्यरत राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण (NHA) यांनी विकसित केलेला ‘आयुष्मान सारथी’ हा चॅटबॉट नागरिकांना आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना (AB PM-JAY) अंतर्गत उपलब्ध सेवांचा सोपा, सुरक्षित आणि व्हॉट्सॲपद्वारे 24 तास लाभ घेण्याची सुविधा उपलब्ध करून देणार आहे.

या चॅटबॉटच्या माध्यमातून लाभार्थींना कोणत्याही सरकारी कार्यालयात किंवा कॉल सेंटरशी संपर्क साधण्याची आवश्यकता न पडता, पीएम-जेएवाय अंतर्गत उपलब्ध असलेल्या महत्त्वाच्या सेवांचा कोणत्याही वेळी, कोणत्याही ठिकाणाहून सहज लाभ घेता येणार आहे.

उपलब्ध प्रमुख सेवा

आयुष्मान सारथी लाभार्थी-केंद्रित विविध सेवा उपलब्ध करून देते. त्यामध्ये पुढील सेवांचा समावेश आहे:

  • पीएम-जेएवाय अंतर्गत पात्रता तपासणी
  • माझे आयुष्मान कार्ड
  • आयुष्मान कार्डसाठी अर्ज करणे
  • आयुष्मान कार्ड डाउनलोड करणे
  • ई-केवायसी (eKYC) पुन्हा करणे
  • आधार लिंक करणे
  • पीएम-जेएवाय कार्ड लॉक / अनलॉक करणे
  • आयुष्मान वय वंदना कार्ड (७० वर्षे व त्यावरील नागरिकांसाठी)
  • उपलब्ध वॉलेट शिल्लक पाहणे
  • उपचारांचा इतिहास पाहणे
  • जवळील सूचीबद्ध रुग्णालये शोधणे
  • तक्रार नोंदवणे, तक्रारीची स्थिती जाणून घेणे आणि तक्रार मागे घेणे
  • कॉलबॅकची विनंती करणे
  • रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर अभिप्राय देणे

लाभार्थ्यांचा अनुभव अधिक सक्षम होण्यास मदत

आयुष्मान सारथी अधिक सुलभ, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख सेवा देण्यासाठी तयार करण्यात आली आहे. त्याद्वारे:

  • व्हॉट्सॲपद्वारे पीएम-जेएवायच्या सेवांमध्ये त्वरित प्रवेश मिळतो.
  • API-आधारित रियल-टाइम सेवा उपलब्ध होतात.
  • सरकारी कार्यालये आणि कॉल सेंटरवरील अवलंबित्व कमी होते.
  • तक्रारींची वेळेत नोंदणी आणि लाभार्थ्यांना आवश्यक मदत मिळण्यास साहाय्य होते.
  • रुग्णालयातून डिस्चार्जनंतर डिजिटल माध्यमातून अभिप्राय संकलित करून सेवांच्या गुणवत्तेवर अधिक प्रभावीपणे देखरेख ठेवता येते.

उत्तम आरोग्यसेवेसाठी डिजिटल प्रशासन

हा चॅटबॉट पीएम-जेएवाय लाभार्थी आणि राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण (NHA) यांच्यातील महत्त्वाचा डिजिटल दुवा म्हणून कार्य करतो. त्यामुळे अधिक कार्यक्षम पद्धतीने सेवा पुरवून लाभार्थ्यांचे समाधान होते.

आयुष्मान सारथीचा वापर कसा कराल?

लाभार्थी अधिकृत पीएम-जेएवाय व्हॉट्सॲप चॅटबॉट – आयुष्मान सारथीचा वापर खाली दिलेला QR कोड स्कॅन करून किंवा +91 72908 23838 या व्हॉट्सॲप क्रमांकावर "Hi" असा संदेश पाठवून करू शकतात.

हा चॅटबॉट 24x7 उपलब्ध असून, API-आधारित सुरक्षित पद्धतीने पीएम-जेएवायच्या विविध सेवांचा लाभ उपलब्ध करून देतो.

 

* * *

शैलेश पाटील/वैभवी जोशी/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2279205) आगंतुक पटल : 9
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Tamil , Telugu