आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या हस्ते बाह्यरुग्ण सेवा देणाऱ्या लहान दवाखान्यांसाठी सी-डॅकने विकसित केलेल्या आणि आयुष्मान भारत डिजिटल अभियानाचे पाठबळ असलेल्या eSushrut@Clinic या light अर्थात साधारण मूलभूत स्वरुपाच्या उपकरणांवरही चालू शकेल अशा स्वरुपाच्या रुग्णालय व्यवस्थापन माहिती प्रणालीचा प्रारंभ
eSushrut@Clinic मुळे लहान स्वरुपाच्या दवाखान्यांमधील आरोग्य व्यवस्थेच्या डिजिटायझेशनमधील त्रुटी दूर होणार, तसेच सरकारी पाठबळ असलेल्या तसेच किफायतशीर दरातल्या रुग्णालय व्यवस्थापन माहिती प्रणालीचा पर्यायही उपलब्ध होणार
प्रविष्टि तिथि:
29 JUN 2026 7:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 जून 2026
लहान स्वरुपाच्या अनेक बाह्यरुग्ण सेवा देणाऱ्या दवाखान्यांना बहुतांश प्रक्रिया या प्रत्यक्ष हाताने कराव्या लागतात तसेच किफायशीर दरातील डिजिटल सोयी सुविधांचा अभाव असल्याने त्यांना असंख्य आव्हानांचा सामना करावा लागतो. यासोबतच मोठ्या रुग्णालयांमध्ये वापरली जाणारी रुग्णालय व्यवस्थापन माहिती प्रणाली (HMIS - Hospital Management Information System) अर्थात बऱ्याचदा या लहान दवाखान्यांसाठी अत्यंत क्लिष्ट स्वरुपाची आणि खर्चिकही असते. आरोग्य व्यवस्थेच्या डिजिटायझेशनमधील अशा प्रकारच्या त्रुटींमुळेच अशा लहान दवाखान्यांना संघर्ष करावा लागतो. आजमितीला खाजगी क्षेत्रात असंख्य रुग्णालय व्यवस्थापन माहिती प्रणाली सेवा देणाऱ्या कंपन्या उपलब्ध आहेत.
मात्र असे असूनही, सरकारचे पाठबळ असलेली आणि किफायतशीर स्वरुपातली रुग्णालय व्यवस्थापन माहिती प्रणाली असावी, अशी मागणी अशा छोट्या स्वरुपातल्या भागीदारांकडून सातत्याने केली जात होती. अनेक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनीही त्यांच्या राज्यांतील सार्वजनिक आरोग्य सुविधांसाठी, तांत्रिक पातळीवर light अर्थात साधारण मूलभूत स्वरुपाच्या उपकरणांवरही चालू शकेल अशा स्वरुपाच्या रुग्णालय व्यवस्थापन माहिती प्रणालीचा वापर करण्याची इच्छाही अनेकदा व्यक्त केलेली आहे. आरोग्य सेवा क्षेत्रातील डिजिटायझेशन अजूनही सुरुवातीच्या टप्प्यात आहे, अशा वेळी त्यांच्यासाठी अशा स्वरुपाची रुग्णालय व्यवस्थापन माहिती प्रणाली उपलब्ध करून देणे आयुष्मान भारत डिजिटल अभियानाचा (ABDM - Ayushman Bharat Digital Mission) अवलंब करण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरणार आहे.
या अनुषंगानेच रुग्णालय व्यवस्थापन माहिती प्रणालीशी संबंधित समस्येचे निराकरण करण्यासाठी, केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी आज दिल्ली इथे eSushrut@Clinic (ई-सुश्रुत@क्लिनिक) चा प्रारंभ केला. ही सुविधा विशेष करून बाह्यरुग्ण सेवा देणाऱ्या लहान दवाखान्यांसाठी तयार केलेली असून, तांत्रिक पातळीवर light अर्थात साधारण मूलभूत स्वरुपाच्या उपकरणांवरही चालू शकणारी आहे. या सुविधेमुळे एक सोपा, किफायतशीर आणि वापरकर्त्यासाठी सुलभ स्वरुपाचा डिजिटल पर्याय सीडॅकने (C-DAC - Centre for Development of Advanced Computing) विकसित केला आहे. ही प्रणाली सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्रे, आरोग्य आणि कल्याण केंद्रे, उपकेंद्रे तसेच खाजगी दवाखान्यांसाठी खुली करण्याचा प्रस्ताव आहे. सध्या, 800 पेक्षा जास्त आरोग्य सुविधा केंद्र eSushrut@Clinic शी जोडल्या गेल्या आहेत. याद्वारे आत्तापर्यंत 680 पेक्षा जास्त आरोग्य विषयक नोंदी देखील तयार करण्यात आल्या आहेत. सीडॅकच्या वतीनेच eSushrut सॉफ्टवेअरची अंमलबजावणी देखील केली जात आहे. आजमितीला हे सॉफ्टवेअर 15 पेक्षा जास्त अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS) आणि विविध राज्य सरकारी रुग्णालयांमध्ये स्थापित केली जात आहेत.
वैशिष्ट्ये:
eSushrut@Clinic ही lightweight अर्थात मूलभूत साधारण मूलभूत स्वरुपाच्या उपकरणांवरही चालू शकेल आणि उपकरणामध्ये माहितीसाठा साठवण्यासाठी जास्त जागेची गरज नसलेली, आणि विशेषतः बाह्यरुग्ण सेवा देणाऱ्या दवाखान्यांसाठी तयार केलेली एक क्लाउड-आधारित रुग्णालय व्यवस्थापन माहिती प्रणाली आहे. या प्रणालीअंतर्गत खाली नमूद बाबींचा अंतर्भाव आहे:
- दवाखान्याच्या कामकाजाचे स्वयंचलनीकरण (ऑटोमेशन) : रुग्ण नोंदणी, बिलिंग, व्यवस्थापन माहिती प्रणाली (MIS) अहवाल तयार करणे, स्पीच टू टेक्स्ट (बोललेले टंकित स्वरुपात लिप्यांतरण करणे) कार्यपद्धती आणि वैद्यकीय निर्णय सहाय्यक प्रणाली यांसारख्या प्रक्रिया सुलभतेने करता येतात, यामुळे काम सोपे होते आणि चुका कमी होतात.
- किफायतशीर स्वरुपाचा पर्याय : ही सुविधा म्हणजे लहान स्वरुपाची आरोग्य विषयक सुविधा केंद्र आणि दवाखान्यांसाठी परवडणाऱ्या दरातील पर्याय आहे, यामुळे आशा आरोग्य केंद्रांना मोठा खर्च न करताही डिजिटल आरोग्य सेवा वापरात आणणे शक्य होणार आहे.
- वापरण्यास सोपे : या प्रणालीची रचना आणि आणखी ही साधी सोप्पी आणि समजण्याच्या दृष्टीने सुलभ आहे. यामुळे संबंधित दवाखान्यातील कर्मचाऱ्यांकडे कोणतीही विशिष्ट तांत्रिक कौशल्ये असणाची आवश्यकता भासणार नाही.
- क्लाउड-आधारित प्रणाली : ही सुविधा म्हणजे एक अत्यंत सुलभ स्वरुपाचे व्यासपीठ असून, या व्यासपीठाचा वापर कोणत्याही उपकरणावरून केला जाऊ शकतो, आणि त्यासाठी कोणत्याही क्लिष्ट स्वरुपाच्या सेटअपची गरज भासत नाही.
- दवाखान्याशी जोडून घेण्याच्या ऑनबोर्डिंग प्रक्रियेत हेल्थ प्रोफेशनल रजिस्ट्री अर्थात वैद्यकीय क्षेत्रातील व्यावसायिक तज्ञांच्या माहितीची नोंद' तसेच, हेल्थ फॅसिलिटी रजिस्ट्री अर्थात आरोग्यविषयक सेवा पुरवणाऱ्या केंद्रांच्या माहितीची नोंद या घटकांचा अंतर्भाव आहे. यासंदर्भातील माहितीच्या नोंदींचा, नोंदणी नसलेले डॉक्टर वापर करू शकत नाहीत. यामुळे केवळ अधिकृत डॉक्टरच eSushrut@Clinic सुविधेचा वापर करू शकतील याची सुनिश्चिती होणार आहे.
- आभा नोंदींचा शोध घेणे, वैद्यकीय निर्णय सहाय्यक प्रणाली, स्कॅन अँड शेअर, स्पीच टू टेक्स्ट या आणि अशा आयुष्मान भारत डिजिटल संबंधित अद्ययावत सुविधांचा अंतर्भाव या प्रणालीअंतर्गत असणार आहे.
डिजिटल आरोग्य सेवा आणि आयुष्मान भारत डिजिटल अभियानाच्या अवलंबाचा विस्तार करण्याच्या आपल्या भूमिकेचा एक भाग म्हणून राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण (NHA), सीडॅक सोबत एक सामंजस्य करार करणार आहे. या सामंजस्य करारांतर्गत, सीडॅकद्वारे सॉफ्टवेअरची देखभाल आणि अद्ययावतीकरणाची जबाबदारी पार पाडली जाईल, तर राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या वतीने हा उद्देश साध्य करण्यासाठीचे सहकार्य आणि आर्थिक सहाय्य पुरवले जाईल. याअंतर्गत सीडॅकला खाली नमूद बाबींसाठी आर्थिक पाठबळ पुरवण्याचा प्रस्ताव आहे :
- आयुष्मान भारत डिजिटल अभियानाशी संबंधित तसेच इतर सूचनांसंबंधी रुग्णांना पाठवल्या जाणाऱ्या संदेशांचा (SMS) खर्च
- क्लाउड होस्टिंग ॲप्लिकेशनसाठीचा खर्च
ग्राहकांना प्राथमिक सहाय्य पुरवण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या वतीने कॉल सेंटरची सेवा देखील दिली जाणार आहे.या कॉल सेंटर कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आणि गुणवत्तेचे परीक्षण करण्याची जबाबदारी सीडॅकडे असणार आहे.
eSushrut@Clinic सुविधेचा वापर करण्यासाठीचा खर्च प्रति 5 वापरकर्त्यांसाठी 499 रुपये प्रति महिना इतका असेल असा अंदाज आहे. राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या सामंजस्य करारांतर्गत या खर्चात 200 रुपयांची सूट दिली जाईल, यामुळे प्रत्यक्षातला दर 299 प्रति महिना असा होईल. सुरुवातीच्या 3 महिन्यांसाठी हे सॉफ्टवेअर विनामूल्य दिले जाईल. समाविष्ट केलेल्या 5 वापरकर्त्यांच्या मर्यादेपेक्षा प्रत्येक अतिरिक्त वापरकर्त्यासाठी 50 रुपये प्रति वापरकर्ता या दराने शुल्क आकारले जाणार आहे.
* * *
शैलेश पाटील/तुषार पवार/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2279153)
आगंतुक पटल : 10