औषधनिर्मिती विभाग
azadi ka amrit mahotsav

वैद्यकीय उपकरण उद्योग बळकटीकरण योजनेअंतर्गत शासनाने मागवले प्रस्ताव


वैद्यकीय उपकरण क्षेत्रात देशांतर्गत उत्पादन आणि नवोन्मेषाला प्रोत्साहन देण्यासाठी दोन प्रमुख उप-योजनांअंतर्गत मागवले प्रस्ताव

प्रविष्टि तिथि: 29 JUN 2026 6:47PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 29 जून 2026

 

रसायन आणि खते मंत्रालयाच्या औषधनिर्माण विभागाने वैद्यकीय उपकरण उद्योग बळकटीकरण योजनेअंतर्गत (एसएमडीआय) पात्र संस्थांकडून प्रस्ताव मागवले आहेत. वैद्यकीय उपकरण क्षेत्रात देशांतर्गत उत्पादनाला प्रोत्साहन देणे, आयातीवरील अवलंबित्व कमी करणे, नवोन्मेषाला पाठिंबा देणे आणि मूल्य साखळी अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने हे प्रस्ताव मागवण्यात आले आहेत.

खालील दोन उप-योजनांअंतर्गत प्रस्ताव मागवण्यात येत आहेत:

  1. आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी अल्प गुंतवणूक योजना (एमडीसीएसएस)
  2. वैद्यकीय उपकरण क्लिनिकल अभ्यास सहाय्य योजना

अल्प गुंतवणूक योजनेअंतर्गत, निवडलेल्या अर्जदारांना प्रमुख घटक/कच्चा माल/तयार उपकरणे/ॲक्सेसरीजच्या उत्पादनासाठी परतफेड तत्त्वावर 10 कोटी रुपयांपर्यंतचे एक-वेळ भांडवली अनुदान देऊन प्रोत्साहित केले जाईल. यामुळे आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यात मदत मिळेल.

विभाग, एमडीसीएसएस योजनेअंतर्गत निवडलेल्या अर्जदारांना क्लिनिकल तपासणी/क्लिनिकल कार्यप्रदर्शन मूल्यांकन/बाजारोत्तर पाठपुरावा अभ्यास/प्राण्यांवरील अभ्यास करण्यासाठी परतफेड तत्त्वावर 5 कोटी रुपयांपर्यंतचे आर्थिक सहाय्य प्रदान करेल.

या योजनेअंतर्गत प्रस्ताव 23 जुलै 2026 (सायंकाळी 6:00 वाजेपर्यंत) http://smdi.lsssdc.in या संकेतस्थळावर पोर्टलद्वारे सादर करावे लागतील. पात्रता, अर्ज प्रक्रिया तसेच इतर अटी आणि शर्तींच्या तपशीलासाठी, कृपया औषधनिर्माण विभागाच्या https://pharma-dept.gov.in/schemes या संकेतस्थळाला भेट द्या.

 

* * *

शैलेश पाटील/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2279142) आगंतुक पटल : 8
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Gujarati , Tamil , Malayalam