पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

135 व्या ‘मन की बात’ कार्यक्रमातील ठळक मुद्दे पंतप्रधानांनी केले सामाईक

प्रविष्टि तिथि: 28 JUN 2026 8:36PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘मन की बात’च्या 135 व्या भागातील ठळक मुद्दे सामाईक केले.

पंतप्रधानांनी एक्सवरील पोस्टमध्ये सांगितले:

आजच्या 'मन की बात'ची सुरुवात सुरक्षा आणि आत्मनिर्भरतेशी संबंधित सकारात्मक घडामोडींनी केली.

जुनी मानसिकता मोडून इतरांप्रती सहानुभूती दाखवण्यात मार्गदर्शक भूमिका निभावणाऱ्या आसाममधील माझ्या भगिनी-बंधूंचा मला अभिमान आहे. #MannKiBaat

नागालँडमधील क्रीडा प्रोत्साहनाशी संबंधित हे दोन उपक्रम तुम्हाला नक्की आवडतील...#MannKiBaat

नालंदा विद्यापीठ आणि केंद्रीय संस्कृत विद्यापीठ हे परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम कसा साधत आहेत, हे पाहण्यासारखे आहे.#MannKiBaat

ब्रह्मकमल डोमिनिकाना वैदिक मंत्र चैंटिंग ग्रुप यांनी भारतीय संस्कृतीबद्दल दाखवलेली श्रद्धा वाखाणण्याजोगी आहे. #MannKiBaat

मेघालयमधील लोकांनी ज्या पद्धतीने जिवंत मुळांचे पूल जपले आहेत, त्याचा भारताला अभिमान आहे. #MannKiBaat

आपण भारतीयांनी वारंवार सिद्ध केले आहे की लोकसहभागाची ताकद ही आपली मोठी संपत्ती आहे. पश्चिम आशियातील संकटाच्या पार्श्वभूमीवर मी केलेल्या आवाहनाला लोकांनी मनापासून पाठिंबा दिला आणि सक्रिय सहकार्यही केले, याचा मला अत्यंत आनंद आहे. #MannKiBaat

नांदेड मधील बहादूरपुरा येथील पेठकर कुटुंबाने विवाह समारंभाच्या निमित्ताने गावकऱ्यांचा अपघात विमा उतरवून एक नवा आदर्श निर्माण केला आहे. संकटाच्या काळात संरक्षण कवच ठरणाऱ्या प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेची माहिती तुम्ही तुमच्या कुटुंबीयांसोबत नक्की सामाईक करा, असे माझे आवाहन आहे. #MannKiBaat

मध्यप्रदेश मधील राजगढ जिल्ह्यातील ब्यावरा येथील महिला शक्तीने कचऱ्यापासून कमाल घडवून आणली आहे. त्यांनी लोकसहभागातून प्लास्टिक कचरा गोळा करून त्यापासून तयार केलेल्या इको-ब्रिक्स म्हणजेच पर्यावरण स्नेही विटा शहराचे सौंदर्य वाढत आहे. #MannKiBaat

आगामी गणेश चतुर्थी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणपती बाप्पांच्या मूर्ती बनवणारे कारागीर आणि खरेदीदार यांच्यासाठी माझे विशेष आवाहन आहे... ”#MannKiBaat

***

सुषमा काणे/गजेंद्र देवडा/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 2278712) आगंतुक पटल : 12
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Gujarati