पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी घेतली मॉरिशसच्या पंतप्रधानांची भेट.
प्रविष्टि तिथि:
28 JUN 2026 8:45PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिक्टोरिया, माहे येथे मॉरिशसचे पंतप्रधान महामहिम डॉ. नवीनचंद्र रामगुलाम यांची भेट घेतली. सेशेल्सच्या राष्ट्रीय दिनाच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमामध्ये दोन्ही नेत्यांची भेट झाली. पंतप्रधान रामगुलाम यांनी नोव्हेंबर 2024 मध्ये पदभार स्विकारल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेली ही चौथी भेट आहे.
दोन्ही नेत्यांनी भारत आणि मॉरिशस दरम्यानच्या सध्याच्या सहकार्याविषयी चर्चा केली. त्याशिवाय भारताकडून जाहीर झालेल्या विशेष आर्थिक सहकार्य मदतीच्या अंमलबजावणीच्या प्रगतीचा आढावा त्यांनी घेतला. पंतप्रधान मोदी यांनी, मॉरिशसच्या विकास आणि प्रगतीला भारताकडून दिले जाणारे महत्त्व अधोरेखित केले. सध्या सुरू असलेले द्विपक्षीय प्रकल्पांचे मॉरिशसमधील आरोग्यसेवा, दळणवळण व्यवस्था, शाश्वत विकास आणि नील अर्थव्यवस्था या क्षेत्रांत लाभत असलेले योगदान अधोरेखित केले.
दोन्ही पंतप्रधानांनी, भारताच्या व्हिजन महासागर आणि शेजारी देश प्रथम या धोरणाअंतर्गत भारत-मॉरिशस दरम्यान वृद्धिंगत होणाऱ्या धोरणात्मक भागीदारीचे महत्त्व तसेच विकसनशील देशांप्रती सामायिक कटिबद्धतेविषयी सहमती दर्शवली.
परस्पर विकास आणि हिंदी महासागर क्षेत्रात शांतता, स्थिरता व समृद्धी राखण्यासाठी एकत्रित काम करत राहण्याच्या संकल्पाचा त्यांनी पुनरुच्चारही केला.
***
सुषमा काणे/विजयलक्ष्मी साळवी साने/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2278705)
आगंतुक पटल : 13