संरक्षण मंत्रालय
भारतीय नौदलाचे 'आयएनएस सुदर्शिनी' हे उंच शिडाचे जहाज बाल्टिमोर, अमेरिका येथे दाखल
प्रविष्टि तिथि:
27 JUN 2026 12:47PM by PIB Mumbai
'लोकायन 26' या महासागर पार करणाऱ्या ऐतिहासिक मोहिमेचा एक भाग म्हणून, भारतीय नौदलाचे शिडाचे प्रशिक्षण जहाज 'आयएनएस सुदर्शिनी' 26 जून 2026 रोजी बाल्टिमोर बंदर (मॅरीलँड, अमेरिका) येथे पोहोचले. नॉरफोकहून सुरू झालेल्या या प्रवासादरम्यान जहाजाने मध्य-अटलांटिकमधील प्रमुख पुलांच्या खालून ऐतिहासिक 'चेझापीक आणि डेलावेअर' कालव्यातून प्रवास केला.
'आयएनएस सुदर्शिनी'ची बाल्टिमोर भेट भारताचा समृद्ध सागरी वारसा आणि भारतीय नौदल तसेच अमेरिकी नौदल यांच्यातील मैत्री आणि सहकार्याचे दृढ संबंध अधोरेखित करते. आपल्या या मुक्कामादरम्यान, हे जहाज अमेरिकेच्या 250 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित 'सेल 250 मेरीलॅन्ड' च्या मुख्य सोहळ्यापूर्वी विविध सागरी संवाद आणि सामुदायिक संपर्क उपक्रम राबवणार आहे.
बाल्टिमोर येथे पोहोचण्यापूर्वी, सुदर्शिनीने 19 ते 23 जून 2026 या कालावधीत नॉरफोक येथे झालेल्या 'सेल 250 व्हर्जिनिया' सोहळ्यात भाग घेतला होता. या सोहळ्यात जगभरातील भव्य शिडांच्या जहाजांसोबत सामील होत 'आयएनएस सुदर्शिनी'ने 'परेड ऑफ सेल' आणि 'सिटी क्रू परेड' या संचलनांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते.
कोची ते नॉरफोक अशा पाच महिन्यांत 13,000 हून अधिक सागरी मैलांचा प्रवास पूर्ण करणारी ही महासागरीय मोहीम भारताच्या सागरी परंपरांचे आणि 'वसुधैव कुटुंबकम्' या भावनेचे जिवंत प्रतीक आहे; जी महासागरांच्या सीमा ओलांडून मैत्री, सहकार्य आणि परस्परांमधील विश्वास वृद्धिंगत करत आहे.
(3)IJS8.jpeg)
(3)PCO0.jpeg)
***
सुषमा काणे/आशुतोष सावे/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2278425)
आगंतुक पटल : 16