संरक्षण मंत्रालय
भारतीय नौदलाच्या पूर्व ताफ्यातील उदयगिरी, 'कावरत्ती आणि शक्ती ही जहाजे थायलंडमधील सत्ताहिप येथे दाखल
Posted On:
27 JUN 2026 1:40PM by PIB Mumbai
आग्नेय आशियाई प्रदेशातील कार्यासाठीच्या तैनातीचा एक भाग म्हणून, भारतीय नौदलाच्या ईस्टर्न फ्लीट मधील उदयगिरी, कावरत्ती आणि शक्ती ही जहाजे थायलंडमधील सत्ताहिप येथे दाखल झाली आहेत.
ईस्टर्न फ्लीट चे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग रिअर ॲडमिरल आलोक आनंद यांच्या नेतृत्वाखालील या जहाजांचे थायलंडच्या रॉयल थाई नेव्ही तर्फे स्वागत करण्यात आले. पोर्ट कॉल नावाने ओळखली जाणारी ही भेट आग्नेय आशियाई देशांशी भारताच्या निरंतर सागरी संबंधांचा एक भाग असून, त्यातून भारत आणि थायलंड यांच्यातील घनिष्ठ आणि दीर्घकालीन सागरी भागीदारी दिसून येते.
या भेटीदरम्यान व्यावसायिक देवाणघेवाण, एकमेकांच्या जहाजांना भेटी, परिचालन संबंधी संवाद, क्रीडा उपक्रम आणि सामुदायिक संपर्क यांसारखे कार्यक्रम आयोजित केले जातील. नौदलांमधील परस्पर सहकार्य आणि परस्पर कार्यपद्धती अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने हे उपक्रम आयोजित केले जात असतात.
या भेटीचा उद्देश भारत आणि थायलंड यांच्यातील मैत्री, परस्पर सहकार्य आणि द्विपक्षीय सागरी संबंध अधिक बळकट करणे हा आहे. तसेच, ही भेट भारतीय नौदलाच्या जहाजांची स्वदेशी रचना, मॉड्यूलर बांधणी आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान यांचे दर्शन घडवते; त्याद्वारे भारताची वाढती क्षमता आणि संरक्षण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील एक विश्वसनीय भागीदार म्हणून भारताची ओळखही अधोरेखित होते.
MJUS.jpeg)



***
सुषमा काणे/राजेश शिरभाते/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2278401)
अभ्यागत कक्ष : 59