ग्रामीण विकास मंत्रालय
राष्ट्रीय ग्रामीण विकास संमेलनात सरस आजीविका करणार महिलांच्या नेतृत्वाखालील ग्रामीण उपक्रमाची उद्योजकता प्रदर्शित
प्रविष्टि तिथि:
26 JUN 2026 7:47PM by PIB Mumbai
ग्रामीण विकास मंत्रालयाने दीनदयाळ अंत्योदय योजना – राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान (DAY-NRLM) अंतर्गत महिला बचत गटांनी बनवलेल्या उत्पादनांचे ब्रँडिंग मजबूत करण्यासाठी आणि त्यांची बाजारपेठीय उपलब्धता वाढवण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. बचत गटांच्या उत्पादनांसाठी एक वेगळी राष्ट्रीय ओळख निर्माण करण्यासाठी, मंत्रालयाने सरस (SARAS), सरस आजीविका (SARAS Aajeevika) आणि आजीविका (Aajeevika) यांसारखे ट्रेडमार्क मिळवले आहेत, ज्यांचा उपयोग बचत गटांच्या उत्पादनांना राष्ट्रीय, प्रादेशिक, राज्य आणि जिल्हा स्तरावर प्रोत्साहन देण्यासाठी तसेच त्यांचे विपणन करण्यासाठी केला जात आहे. देशभरात आयोजित केल्या जाणाऱ्या सरस मेळाव्यांच्या माध्यमातून या ब्रँड्सची पोहोच आणि दृश्यमानता आणखी मजबूत केली जाते.

स्वयं-सहायता गटाच्या दर्जेदार उत्पादनांना एक कायमस्वरूपी किरकोळ विक्री व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने मंत्रालयाने नवी दिल्लीतील बाबा खडक सिंग मार्गावर 'सरस आजीविका गॅलरी'ची स्थापना केली आहे, जिथे देशभरातील महिला स्वयं-सहायता गटांनी तयार केलेली निवडक उत्पादने प्रदर्शित केली जातात. या प्रयत्नांना पूरक म्हणून, मंत्रालयाने 'ई-सरस' ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आणि मोबाईल ॲप्लिकेशन देखील सुरू केले आहे, ज्यामुळे ग्रामीण महिला उद्योजकांना डिजिटल बाजारपेठांमध्ये प्रवेश मिळवणे आणि देशभरातील ग्राहकांशी संपर्क साधणे शक्य झाले आहे.
सरस आजीविका ब्रँडने स्थानिक हस्तकलांच्या संकल्पनेला, महिला बचत गट उद्योजकांनी बनवलेल्या अस्सल ग्रामीण उत्पादनांच्या एका संघटित आणि परिचित परिसंस्थेमध्ये रूपांतरित करण्यास मदत केली आहे.
मंत्रालय या उपक्रमांच्या आधारे राष्ट्रीय ग्रामीण विकास संमेलन (आरजीव्हीएस) 2026 मध्ये सरस आजीविका गॅलरीच्या माध्यमातून ग्रामीण महिलांच्या उद्योजकीय कामगिरीचे प्रदर्शन करत आहे.

आरजीव्हीएस 2026 मध्ये सरस गॅलरी देशभरातील महिला-नेतृत्वाखालील स्वयं-सहायता गटांनी तयार केलेल्या उत्पादनांचे एक निवडक प्रदर्शन सादर करत आहे, जे ग्रामीण भारताची समृद्धी आणि विविधता दर्शवते.
या वर्षीच्या प्रदर्शनाचे एक प्रमुख आकर्षण म्हणजे 'सरस शक्ती कलेक्शन'चा आरंभ. हे देशभरातील ग्रामीण महिला बचत गटांनी तयार केलेल्या हस्तनिर्मित उत्पादनांचा समावेश असलेल्या, विचारपूर्वक निवडलेल्या उत्कृष्ट भेटवस्तूंचा संग्रह आहे.
***
निलिमा चितळे/नंदिनी मथुरे/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2278319)
आगंतुक पटल : 11