पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

राजर्षी छत्रपती शाहूजी महाराज यांना पंतप्रधानांनी केले अभिवादन

Posted On: 26 JUN 2026 12:46PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राजर्षी छत्रपती शाहूजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केले.

"त्यांनी आपले जीवन वंचित, शोषित आणि मागासवर्गीयांच्या उत्थानासाठी समर्पित केले. त्यांचे महान कार्य आणि आदर्श आगामी काळात युगानुयुगे देशाला मार्गदर्शन करत राहतील", असे मोदी यांनी नमूद केले.

पंतप्रधानांनी 'एक्स' वर पोस्ट केले:

"राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन! सामाजिक न्याय आणि समतेचे ते खंदे पुरस्कर्ते होते. वंचित, शोषित आणि मागासवर्गीयांच्या उन्नतीसाठी त्यांनी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले. त्यांचे महान कार्य आणि आदर्श युगानुयुगे राष्ट्राला प्रेरणा देत आणि मार्गदर्शन करत राहील."

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन! सामाजिक न्याय आणि समतेचे ते खंदे पुरस्कर्ते होते. वंचित, शोषित आणि मागासवर्गीयांच्या उन्नतीसाठी त्यांनी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले. त्यांचे महान कार्य आणि आदर्श युगानुयुगे राष्ट्राला प्रेरणा देत आणि मार्गदर्शन करत राहील.

***

शिल्पा पोफळे/शैलेश पाटील/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2278186) अभ्यागत कक्ष : 61