सांस्कृतिक मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

'संविधान हत्या दिवस' पाळण्यासाठी केंद्रीय संस्कृती मंत्रालयाकडून कार्यक्रमाचे आयोजन

प्रविष्टि तिथि: 25 JUN 2026 10:21PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 जून 2026

केंद्रीय संस्कृती मंत्रालयाने आज संविधान हत्या दिवस पाळण्यासाठी, केंद्रीय सांस्कृतिक संसाधने  आणि प्रशिक्षण केंद्रामार्फत विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले होते. नवी दिल्लीत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला . केंद्रीय संस्कृती आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणूनन उपस्थित होते. 1975 साली, देशात लागू करण्यात आलेल्या आणीबाणीला पन्नास वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित  या कार्यक्रमाचा उद्देश, लोकशाही, घटनात्मक मूल्ये आणि नागरिकांचे अधिकार यांविषयी जनजागृती करणे हा होता.

भारताच्या डीएनए मध्ये लोकशाही आहे असे सांगत आजचा कार्यक्रम, स्वातंत्र्यासाठी लढा देणाऱ्या अनाम नायकांचे स्मरण आणि गौरव करण्यासाठी असल्याचे, केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यावेळी म्हणाले.  भारताच्या लोकशाहीच्या जीवट आणि लवचिक वृत्तीचा, हा कार्यक्रम एक महत्वाचा दाखलाच आहे, असे ते म्हणाले. गेल्या अनेक दशकांत विविध आव्हानांना सामोरे जावे लागले असले तरी भारतीय लोकशाहीने आपली ताकद आणि स्थैर्य कायम राखल्याचे, त्यांनी सांगितले. आणीबाणीच्या कालखंडाकडे मागे वळून पाहताना, असे जाणवते की या काळाने, आपल्याला लोकशाही, स्वातंत्र्य आणि संविधान यांचे सामर्थ्य आणि मोल समजून घेण्याची संधी दिली असे मतही त्यांनी व्यक्त केले.

आणीबाणीच्या काळात कारावास भोगलेले ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक राम बहादूर राय यांचे यावेळी विशेष भाषण झाले. आपल्या भाषणात त्यांनी आणीबाणीच्या कालखंडात देशासमोर उभ्या राहिलेल्या आव्हानांची आणि त्या कठीण परिस्थितीतही भारतीय लोकशाही संस्थांनी दाखविलेल्या दृढ निश्चयाची माहिती दिली. 

 
निलीमा चितळे/राधिका अघोर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(रिलीज़ आईडी: 2278066) आगंतुक पटल : 12
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , हिन्दी , Tamil