वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
देशाची निर्यात वाढीची गती वाढवण्यासाठी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी निर्यात प्रोत्साहन परिषदा आणि उद्योग संघटनांसोबतच्या चर्चेचे अध्यक्षपद भूषवले
निर्यात प्रोत्साहन परिषदांना नवीन बाजारपेठा, नवीन उत्पादने आणि उच्च निर्यात वाढीवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन
प्रविष्टि तिथि:
25 JUN 2026 9:12PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 जून 2026
निर्यात प्रोत्साहन मोहिमेच्या अंतर्गत झालेल्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आणि भारताच्या निर्यात वाढीला गती देण्याच्या धोरणांवर चर्चा करण्यासाठी, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी 24 जून 2026 रोजी नवी दिल्ली येथे निर्यात प्रोत्साहन परिषदा आणि उद्योग संघटनांसोबतच्या बैठकीचे अध्यक्षपद भूषवले.
व्यापारातील निश्चितता वाढवण्यासाठी आणि व्यापार सुलभतेची प्रक्रिया जलद करण्यासाठी,वैधानिक आणि सुविधा-विषयक समित्यांच्या बैठकांचे संभाव्य वेळापत्रक निश्चित करण्यात आले असून ते DGFT च्या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याची माहिती गोयल यांनी उपस्थितांना दिली.
सर्व ईपीसी आणि उद्योग संघटनांना डीजीएफटी सोबत सक्रियपणे संपर्कात राहण्याचे आणि लक्ष्यीत, मोजता येण्याजोगे व परिणाम-केंद्रित प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन गोयल यांनी केले. देशाची निर्यात लक्षणीयरीत्या वाढवण्याचे सामायिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, जागतिक बाजारपेठांशी भारताचा दुवा म्हणून ईपीसींनी सरकारसोबत मजबूत भागीदारीत काम केले पाहिजे. तसेच, भारताच्या व्यापार करारांमधून निर्माण होणाऱ्या बाजारपेठ प्रवेशाच्या संधींचा पूर्ण लाभ घेतला पाहिजे, यावर त्यांनी भर दिला.
निर्यात प्रोत्साहन अभियानाचे यश केवळ उपाययोजना सुरू करण्यावर नाही, तर निर्यातदारांकडून त्यांचा स्वीकार सुनिश्चित करण्यावरही अवलंबून असेल असे या चर्चेदरम्यान, वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांनी सांगितले.
निर्यात प्रोत्साहन कंपन्यांना निर्यात प्रोत्साहन अभियानाच्या विविध घटकांच्या अंतर्गत, विशेषकरून निर्यात गोदाम आणि लॉजिस्टिक्स, प्रमाणन साहाय्य, व्यापारविषयक माहिती आणि बाजारपेठ प्रवेश या क्षेत्रांमध्ये, सक्रियपणे प्रस्ताव विकसित करण्यास वाणिज्य सचिवांनी प्रोत्साहित केले. नवीन बाजारपेठा ओळखणे, भारताच्या मुक्त व्यापार करारांमुळे निर्माण झालेल्या संधींचा लाभ घेणे आणि विशेषतः लक्षणीय निर्यात क्षमता असलेल्या प्रदेशांमधील प्रमुख आंतरराष्ट्रीय व्यापार कार्यक्रमांमध्ये व्यापक सहभागासाठी प्रोत्साहन देण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
जिल्हा निर्यात केंद्र उपक्रमात निर्यात संवर्धन परिषदांच्या सक्रिय सहभागाचे महत्त्व वाणिज्य सचिवांनी अधोरेखित केले आणि राष्ट्रीय,राज्य व जिल्हा स्तरांवर नोडल अधिकारी नियुक्त करण्याचे आवाहन केले.
निलीमा चितळे/पर्णिका हेदवकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2278032)
आगंतुक पटल : 7