सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

'एम्बार्क इंडिया डेव्हलपमेंट शिष्यवृत्ती' प्रस्तावासाठी सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाकडून 'ग्राम' (GRAAM) सोबत इरादापत्रावर स्वाक्षरी

Posted On: 25 JUN 2026 12:06PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 25 जून 2026

 

सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने दोन शिष्यवृत्ती धारकांच्या नियुक्तीसाठी 'ग्रासरूट्स रिसर्च अँड ॲडव्होकेसी मूव्हमेंट' (GRAAM) सोबत एका इरादापत्रावर स्वाक्षरी केली आहे.

या स्वाक्षरी सोहळ्याला सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाचे महासंचालक (डेटा सुशासन), पी. आर. मेश्राम उपस्थित होते. 'ग्राम' (GRAAM) चे कार्यकारी संचालक डॉ. बसवराजू आर. श्रेष्ठ आणि मंत्रालयाच्या क्षमता विकास विभागाच्या प्रशिक्षण युनिटचे संचालक प्रसून वर्मा यांनी या इरादापत्रावर स्वाक्षरी केली.

हा संयुक्त उपक्रम सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाचे आणि ग्राम यांच्यातले एक व्यावहारिक आणि सहयोगी व्यासपीठ असून, त्यात अत्यंत प्रेरित आणि संशोधन-केंद्रित व्यक्ती मंत्रालयासोबत काम करतील. या कार्यक्रमाच्या माध्यमातून, शिष्यवृत्तीधारक चालू असलेल्या किंवा नवीन उपक्रमांना पाठबळ देतील, संशोधनाद्वारे नाविन्यपूर्ण उपाय विकसित करण्यात योगदान देतील आणि विकास, क्षमता बांधणी तसेच सुशासनावरील गंभीर आव्हानांना अचूकता आणि नाविन्यपूर्ण पद्धतीने सामोरे जायला मदत करतील. या उपक्रमाचा उद्देश शिष्यवृत्तीधारकांच्या कौशल्यांचा मंत्रालयाच्या फायद्यासाठी वापर करणे, तसेच त्यांना सार्वजनिक धोरण आणि सुशासनाचा व्यावहारिक अनुभव देणे, हा आहे.

 

* * *

यश राणे/निखिलेश चित्रे/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2277702) अभ्यागत कक्ष : 46