राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिली कुनो राष्ट्रीय उद्यानाला भेट

प्रविष्टि तिथि: 21 JUN 2026 10:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 21 जून 2026

 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (21 जून, 2026) रोजी मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानाला भेट दिली. त्यांनी राष्ट्रीय उद्यानाच्या चित्ता व्यवस्थापन क्षेत्राचा दौरा केला. यावेळी त्यांना विभागीय वनाधिकाऱ्यांनी प्रोजेक्ट चीता बद्दल माहिती दिली.

राष्ट्रपतींच्या नोव्हेंबर 2025 मधील बोट्स्वाना दौऱ्यादरम्यान भारताला बोट्स्वानाकडून प्रतीकात्मक स्वरुपात आठ चित्ते भेट म्हणून देण्यात आले होते, या चित्त्यांना नंतर फेब्रुवारी 2026 मध्ये कुनो येथे आणण्यात आले.

केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या अंतर्गत आणि राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या नेतृत्वाखाली 17 सप्टेंबर 2022 रोजी सुरू करण्यात आलेला प्रोजेक्ट चीता हा उपक्रम म्हणजे जैवविविधतेचे संवर्धन करण्याच्या भारताच्या सातत्यपूर्ण वचनबद्धतेचे प्रतीक आहे. देशातून नामशेष झालेल्या चित्ता या प्राण्याला पुन्हा एकदा देशात स्थापित करणे, हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे.

प्रोजेक्ट चीता अंतर्गत कुनो राष्ट्रीय उद्यानात भारतातील पहिले चित्ता पुनर्वसन स्थळ विकसित करण्यात आले असून येथे चित्त्यांसाठी योग्य अधिवास आणि  मुबलक भक्ष्य उपलब्ध आहे तसेच येथे किमान मानवी हस्तक्षेप आहे. कुनो राष्ट्रीय उद्यानात सप्टेंबर 2022 मध्ये नामिबिया येथून चित्त्यांच्या पहिल्या तुकडीचे आगमन झाले, तर दुसरी तुकडी फेब्रुवारी 2023 मध्ये दक्षिण आफ्रिकेवरुन आणि तिसरी तुकडी बोट्स्वानामधून फेब्रुवारी 2026 मध्ये दाखल झाली.

 

* * *

नितीन फुल्‍लुके/भक्‍ती सोनटक्‍के/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2276528) आगंतुक पटल : 7
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali