जागतिक आणि भारतीय कथाकथनाच्या उत्कृष्टतेचा गौरव करत मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2026 मध्ये पोलिश चित्रपट 'सिल्व्हर'ने पटकावला सुवर्ण शंख
इराणच्या 'अंडर द स्नो' चित्रपटाला उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय लघुपट काल्पनिक (शॉर्ट फिक्शन) पुरस्कार; तर 'स्मॉल क्लाउड्स'ची सर्वोत्कृष्ट भारतीय लघुपट काल्पनिक चित्रपट म्हणून निवड
मुंबई, 21 जून 2026
19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा (मिफ) आज दादर येथील रवींद्र नाट्य मंदिर येथे एका भव्य सोहळ्याने समारोप झाला. सात दिवस चाललेल्या या महोत्सवात माहितीपट, लघुपट आणि ॲनिमेशन चित्रपटांची मांदियाळी जमली होती. त्यामधील सर्वोत्तम अशा कलाकृतींना महोत्सवाच्या प्रतिष्ठित 'सुवर्ण शंख' आणि 'रौप्य शंख' पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
महोत्सवात तब्बल 6 श्रेणींमध्ये एकूण 17 पुरस्कार देण्यात आले. यामध्ये एक प्रतिष्ठित सुवर्ण शंख पुरस्कार, पाच रौप्य शंख पुरस्कार, तर 11 सन्मानचिन्हांचा समावेश आहे.
महोत्सवातील सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय माहितीपटाचा प्रतिष्ठित सुवर्ण शंख पुरस्कार आणि 10 लाख रुपयांचे रोख पारितोषिक (चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते यांच्यात समान प्रमाणात विभागले जाते) असा पुरस्कार पोलंडच्या सिल्व्हर या माहितीपटाला प्रदान करण्यात आला.
पोलिश सांस्कृतिक मंत्री-प्लेनिपोटेन्शरी आणि संचालिका मालगोर्झाता वेजिसिस-गोवेंबियाक यांनी दिग्दर्शिका नतालिया कोनियार्झ आणि चित्रपटाचे निर्माता माचेय कुबिकी यांच्या वतीने हा सर्वोच्च पुरस्कार स्वीकारला.

गरिबी, कष्ट आणि प्रतिष्ठा यांच्या काव्यात्मक तरीही तडजोड न करता वेध घेतल्याबद्दल; ज्यामधून स्थानिक वास्तवाचे रूपांतर जागतिक अन्यायावरील एका सखोल चिंतनात होते.
सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय लघुपटाचासाठीचा रौप्य शंख पुरस्कार आणि 5 लाख रुपयांचे रोख पारितोषिक इराणी चित्रपट 'अंडर द स्नो'ला प्रदान करण्यात आले. या चित्रपटाचे सहनिर्माते दीपांकर प्रकाश यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शिका नफिसेह झारे आणि अन्य निर्माते कोट्टुकथिरा प्रकाश यांच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला.

वैयक्तिक सत्य आणि सामाजिक बंधना यांच्यामधील एका तरुण स्त्रीचा संघर्ष धाडसाने आणि बारकाव्यांसह, अत्यंत संयमित आणि मनाला सखोल भिडणाऱ्या चित्र-भाषेतून व्यक्त झाला आहे, त्या मांडणीसाठी.
सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय ॲनिमेशन चित्रपटासाठीचा रौप्य शंख पुरस्कार आणि 5 लाख रुपयांचे रोख पारितोषिक (चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते यांच्यात समान प्रमाणात विभागले जाते) जर्मनीच्या मायाज साँग या ॲनिमेशन चित्रपटाला प्रदान करण्यात आले. हा पुरस्कार प्रमुख ॲनिमेटर आणि स्टुडिओ प्रतिनिधी सानिका कुलकर्णी यांनी चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते फ्रांझिस्का शोननबर्गर आणि जयकृष्णन सुब्रमण्यन यांच्या वतीने स्वीकारला.

कल्पक आणि भावपूर्ण अॅनिमेशनसाठी; ज्यातून सार्वत्रिक प्रभावासह ओळख, आपलेपणा आणि आत्मशोधाचा सखोल प्रवास प्रभावीपणे मांडते.
आंतरराष्ट्रीय स्पर्धा श्रेणी अंतर्गत सर्वोत्कृष्ट छायाचित्रकाराचा (सिनेमॅटोग्राफर) पुरस्कार 'टर्टल वॉकर' या भारतीय माहितीपटासाठी कृष्ण मखिजा यांना प्रदान करण्यात आला.
खोल समुद्रतळाचे मंत्रमुग्ध करणाऱ्या दृश्यानुभवात रूपांतरित करणाऱ्या आणि समुद्री कासवांच्या संवेदनशील/नाजूक जगाला प्रकाशात आणणाऱ्या पाण्याखाली उत्कृष्ट छायाचित्रणासाठी.
आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागातील सर्वोत्कृष्ट संकलनासाठीचा (एडिटिंग) पुरस्कार रशियाचे येवगेनी स्मिरनोव्ह आणि मॅक्सिम स्मिरनोव्ह यांच्या 'अबाउट द काऊ' या लघुपटाला मिळाला. दिग्दर्शक अँटोन सिमुखिन यांनी संपादक जोडीच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला.
वेळ, भावना आणि व्यक्तिरेखा यांचा सहजतेने आणि अचूकतेने प्रवाह साधणाऱ्या उत्कृष्ट चित्रपटीय कारागिरीबद्दल तसेच विनोदाची प्रभावी जोड देत, मनाला खोलवर स्पर्श करणारे आणि अनेक स्तरांनी समृद्ध असे सुंदर कथानक उभे केल्याबद्दल हा गौरव करण्यात आला.
आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागातील सर्वोत्कृष्ट ध्वनी संकलक (साऊंड डिझायनर) पुरस्कार देवा आज पण व्हय या चित्रपटासाठी अभय रुमडे (पर्पल हेझ स्टुडिओ) यांना प्रदान करण्यात आला.
निसर्गातील विविध तत्त्वांना प्रभावी अभिव्यक्ती देणारे सामर्थ्यशाली दृश्यविश्व साकारल्याबद्दल आणि वादळ तसेच खडतर भूभागातून होणाऱ्या एका लहान मुलाच्या प्रवासाचे त्यातून सुंदर प्रतिबिंब उभे केल्याबद्दल ही निवड झाली.
सर्वोत्कृष्ट भारतीय माहितीपटासाठीचा रौप्य शंख पुरस्कार आणि 5 लाख रुपयांचे रोख पारितोषिक (दिग्दर्शक आणि निर्माता यांच्यात विभागून) 'वाई' या माहितीपटाला मिळाले. निर्माते भरतबाला गणपती यांच्या वतीने दिग्दर्शक साईनाथ एस. उस्काईकर आणि जवाहर शर्मा यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

लुप्त होत चाललेल्या भटक्या संगीत परंपरेचे दृश्यात्मकदृष्ट्या प्रभावी चित्रण केल्याबद्दल, करुणा आणि संवेदनशीलता यांचे प्रभावी दर्शन घडवल्याबद्दल; तसेच स्मृती, आवाज आणि वारसा यांच्या आधुनिक काळातील हस्तांतरणाचे अर्थपूर्ण चित्रण केल्याबद्दल माहितीपटाची निवड झाली.
सर्वोत्कृष्ट भारतीय लघुपटासाठीचा रौप्य शंख (सिल्व्हर काँच) पुरस्कार आणि 3 लाख रुपयांचे रोख पारितोषिक 'स्मॉल क्लाउड्स' या चित्रपटाने पटकावले. एफटीआयआय निर्मित या चित्रपटाचा पुरस्कार एफटीआयआयचे कुलगुरू धीरज सिंह आणि दिग्दर्शक शुभम सुमित यांनी स्वीकारला.

धुक्याने आच्छादलेल्या समुद्रकिनाऱ्यांच्या आणि पावसाने भिजलेल्या अंगणांच्या पार्श्वभूमीवर बालपणापासून प्रौढत्वाकडे वाटचाल आणि त्यासोबत नात्यांमध्ये निर्माण होणारे अंतर यांचा प्रवास प्रेक्षकांसमोर प्रभावीपणे उलगडल्याबद्दल, बालपणीच्या नाजूक नातेसंबंधांचे आणि काळाच्या अपरिहार्य प्रवाहाचे अत्यंत संवेदनशीलतेने चित्रण केल्याबद्दल, तसेच उत्कृष्ट कथनशैली, नाविन्यपूर्ण चित्रपटीय मांडणी आणि रूपकांच्या समृद्ध वापराबद्दल या लघुपटाची निवड झाली, असे तज्ज्ञांनी सांगितले.
राष्ट्रीय स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट ॲनिमेशन चित्रपटासाठीचा ' रौप्य शंख' पुरस्कार आणि 3 लाख रुपयांचे रोख पारितोषिक 'आर्मस्ट्राँग फ्रॉम अंगलम्मन टेम्पल स्ट्रीट' या चित्रपटाने पटकावले. दिग्दर्शक आणि निर्माते भुवनेश एम. कुमार यांना पुरस्कार आणि रोख पारितोषिक प्रदान करण्यात आले.

दूरच्या भविष्यकाळाचे धाडसी चित्रण, जुन्या परंपरा आणि बदलत्या जगातील सामाजिक वास्तवावर केलेले भाष्य, तसेच अॅनिमेशनचा केवळ दृश्य माध्यम म्हणून नव्हे तर प्रभावी चित्रपटीय भाषा म्हणून केलेल्या वापराबद्दल याची निवड करण्यात आली.
राष्ट्रीय स्पर्धेअंतर्गत 'सर्वोत्कृष्ट छायाचित्रकार' हा पुरस्कार 'स्मॉल क्लाउड्स' या चित्रपटासाठी रणधीर बिस्वास यांनी पटकावला.
त्यांच्या कॅमेऱ्याची हालचाल, दृश्यरचना आणि रंगसंगती यांचा कथेला खऱ्या अर्थाने उंची प्रदान करणाऱ्या पद्धतीने केलेल्या उत्कृष्ट वापराबद्दल. संवादांशिवायही ज्यांची दृश्ये प्रेक्षकांशी सखोल भावनिक नाते निर्माण करतात.
राष्ट्रीय स्पर्धा विभागात सर्वोत्कृष्ट संकलनाचा पुरस्कार अखिल कृष्णन यांना 'मेडे (MAYDAY)' या चित्रपटासाठी मिळाला. संकलक अखिल कृष्णन यांच्या वतीने दिग्दर्शक सरथ अंबट यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
तणाव, दिशाभूल आणि कृती यांचा उत्कृष्ट वापर करून, समज आणि सहानुभूती यांच्या अभावात आपण ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांनाही मोठी हानी पोहोचवू शकतो, हा प्रभावी संदेश अधोरेखित केल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला.
राष्ट्रीय स्पर्धेच्या श्रेणीअंतर्गत सर्वोत्कृष्ट ध्वनी संयोजनाचा पुरस्कार बिज्ञान दहल यांना कोव्हार्टी (Kovarty) या चित्रपटासाठी प्रदान करण्यात आला.
वास्तव आणि कल्पनारम्यता यांमधील रेषा हळुवारपणे पुसून टाकणाऱ्या, आणि एक खेळकर, भावनिक व सखोल जिवंत जग निर्माण करणाऱ्या त्याच्या इमर्सिव्ह ध्वनी रचनेसाठी (Sound Design).
सर्वात अभिनव/प्रायोगिक चित्रपटासाठीचा प्रमोद पाटी विशेष परिक्षक (ज्युरी) पुरस्कार तैवानच्या, ‘द होर्डर्स’ (The Hoarders) या चित्रपटाला मिळाला. या चित्रपटाच्या दिग्दर्शिका चुआन यिंग लियाओ यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
या धाडसी कथात्मक प्रयोगाची आणि नाविन्यपूर्ण चित्रपटविषयक दृष्टिकोनाची दखल घेत, एका सखोल वैयक्तिक कथेला कलाकृतीच्या एका अद्वितीय आणि विचार करायला लावणाऱ्या रूपात उंचावल्याबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
विकसित भारत/ वंदे मातरम् ची 150 वर्षे/ भारत@2026 या विषयावरील सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार द लास्ट शेल्टर (The Last Shelter) या लघुपटाला मिळाला. भारत अरोरा आणि राजेश भाटिया यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
“द लास्ट शेल्टर” हा एक असा चित्रपट आहे जो लेहमध्ये सोसाव्या लागणाऱ्या अडचणींचे संवेदनशीलपणे चित्रण करतो आणि सोबतच सर्वसमावेशक विकास आणि चांगल्या सामाजिक पाठिंब्याद्वारे लवचिक, सक्षम जीवन जगण्यासाठी भारताच्या प्रयत्नांना अधोरेखित करतो.
सर्वोत्कृष्ट पदार्पणीय दिग्दर्शकासाठीचा दादासाहेब फाळके चित्रनगरी पुरस्कार पूजा तोलानी यांना प्रदान करण्यात आला.
महिला दिग्दर्शकाच्या दृष्टिकोनातून कौटुंबिक रहस्य संवेदनशीलपणे उलगडण्यासाठी, आणि मानवी संबंधांमधील लिंग गतिशीलतेचा एक प्रभावी आणि संस्मरणीय अनुभव तयार करण्यासाठी लघुपट माध्यमाच्या वैशिष्ट्यांचा शोध घेण्यासाठी, सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शकाचा पुरस्कार प्रदान केला जातो: ‘रझा’ साठी पूजा तोलानी.
सर्वोत्कृष्ट विद्यार्थी चित्रपटासाठीचा भारतीय माहितीपट निर्माता संघ (IDPA - Indian Documentary Producers Association) पुरस्कार मिलन कुमार यांना, द ओल्ड बुल नोज, ऑर वन्स न्यू (The Old Bull knows, or Once Knew) या चित्रपटासाठी यांना मिळाला.
द ओल्ड बुल नोज, ऑर वन्स न्यू हे एका नाहीशा होत चाललेल्या भटक्या परंपरेचे आणि एका वृद्ध बैल आणि त्याच्या मालकामधील विरहाचा शांत स्वीकार यांचे एक कृष्णधवल चित्रण आहे.
आंतरराष्ट्रीय चित्रपट समीक्षक महासंघ (FIPRESCI) यांच्याद्वारे देण्यात येणारा, FIPRESCI हा आंतरराष्ट्रीय समीक्षक पुरस्कार प्रदीप कंचनुरू यांना त्यांच्या ‘द हग ऑफ एम्प्टिनेस’ या चित्रपटासाठी प्रदान करण्यात आला.
न्यायासाठी चाललेला एकाकी लढा. एक असा माणूस, ज्याचे सर्व काही हिरावून घेतले गेले आहे, जेव्हा त्याचे संपूर्ण जग उद्ध्वस्त होते तेव्हा तो जगण्याचा आणि पुन्हा उभे राहण्याचा मार्ग शोधतो. कधीही हस्तक्षेप न करणारा कॅमेरा आणि फक्त स्वतःची कथा सांगणारा आवाज यासह, हा चित्रपट चोवीस वर्षांच्या एकांताला प्रतिकाराच्या एका शांत कृतीत बदलतो.
* * *
पीआयबी मुंबई | हर्षल आकुडे/दर्शना राणे
रिलीज़ आईडी:
2276374
| Visitor Counter:
15