MIFF banner

डेव्हिड ॲटनबरो यांच्या जन्मशताब्दी निमित्त ‘मिफ्फ 2026’ मध्ये वन्यजीव आणि विस्मयकथेवरील माहितीपट मालिकेचे विशेष प्रदर्शन

मुंबई, 20 जून 2026

 

डेव्हिड ॲटनबरो यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याच्या  निमित्ताने 19 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (मिफ्फ 2026) डंकन कार्ड दिग्दर्शित आणि स्वत: अॅटनबरो यांचं निवेदन असलेल्या 'सिक्रेट्स ऑफ वाइल्ड इंडिया' या माहितीपट मालिकेचा विशेष खेळ आयोजित करण्यात आला होता. या दिग्गज निसर्गशास्त्रज्ञाने बनवलेली ही बहुप्रशंसित तीन भागांची माहितीपट मालिका, भारतातील घनदाट जंगलं, उंच पर्वत रांगा आणि रखरखीत वाळवंट, अशा तीन अत्यंत भिन्न परिसंस्थांमधील जैवविविधतेचं अद्भुत दर्शन घडवते.

तीन भागांपैकी 'डेझर्ट लायन्स' (Desert Lions) हा भाग वायव्य भारतातील अत्यंत विराण,  आणि प्रतिकूल हवामानाच्या वाळवंटावर  केंद्रित आहे. या ठिकाणी केवळ जगण्याची चिवट झुंज देऊ शकणारी जीव सृष्टीच तग धरू शकते. उत्कृष्ट छायाचित्रणासाठी हा माहितीपट ओळखला जातो. यात भारतीय राष्ट्रध्वज प्रतीकात्मक 'तिरंगी' प्रतिमांमध्ये अतिशय कल्पकतेने गुंफला आहे. माहितीपटातील निवेदनाची शैलीमुळे ही  माहितीपट मालिका  एखाद्या गोष्टीसारखी उलगडत जाते, यामुळे त्याचा दृश्य अनुभव खिळवून ठेवणार ठरतो. यात अ‍ॅटनबरो यांनी वाळवंटाचं वर्णन करताना, 'रुड्यार्ड किपलिंग यांच्या जंगल बुकचं जिवंत आणि वास्तव रूप' असल्याचं म्हटलं आहे. संपूर्ण कथन, मोठ्या, नेमक्या आणि सहज समजण्याजोग्या मजकुरातून सादर करण्यात आलं आहे.

हा चित्रपट नैसर्गिक अन्नसाखळीतील श्रेणीक्रम न बिघडवता, शिकारी आणि भक्ष्य यांच्यातील द्वैत सातत्याने सादर करतो. त्याच वेळी, ते प्रत्येक प्रजातीचा स्वभाधर्म आणि बुद्धिमत्तेचा शोध घेत राहतो. हा माहितीपट एका कमालीच्या विरोधाभासी क्षणाचेही चित्रण करतो, एरवी अत्यंत हिंस्त्र शिकारी असणारी एक वाघीण, आपला जीव वाचवत असलेल्या हरणाच्या पाडसावर  हल्ला करण्याऐवजी त्याला सोडून देताना दिसते, शिकारी आणि भक्ष्य यांच्यातील सीमा पार करणाऱ्या मातृत्वाच्या भावनेची ही एक मूक साक्ष आहे.

विशेषत: अत्यंत जिव्हाळ्याच्या आणि जवळून टिपलेल्या दृश्यामध्ये वाघांच्या मिलनाचे विविध टप्पे टिपले आहेत. याच्या अगदी विरुद्ध, जोडीदाराला आकर्षित करताना, किटकांनी झाडांच्या सालीतून गोड रस मिळवताना त्या कुरतडताना काढलेले विशिष्ट, एकसुरी आणि मंद आवाजही टिपले आहेत.

या कथनात रान गवे, हनुमान लंगूर (माकडे) आणि रानकुत्र्यांसारख्या प्राण्यांचे चित्रण केले आहे, त्याचबरोबर अशा काही ओळखीच्या प्राण्यांनाही चित्रित केले आहे ज्यांना सहसा कॅमेऱ्यात कैद करण्याइतके देखणे किंवा आकर्षक मानले जात नाही. शेवटी, हा माहितीपट वाळवंटातली तीव्र उष्णता वन्यजीवांच्या वर्तनाला कसा आकार देते, याचाही शोध घेतो, जिथे रानडुकरांसारखे प्राणी चिखलात आश्रय घेऊन आराम शोधतात, तर हरणं फक्त पाणी पिण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालतात.

अ‍ॅटनबरो यांचं सूक्ष्म निरीक्षण आणि प्राणीजगताचं सखोल ज्ञान यामुळे हा माहितीपट खरोखरच अत्यंत आनंददायी दृश्य अनुभव देणारा ठरतो. अधिकाधिक मानवकेन्द्रित होत असलेल्या आजच्या काळात, आपण इतर जीवसृष्टी बरोबर शेअर करत असलेल्या या जगातली गुंतागुंत समजून घेण्याचा हा एक सुखावह आणि गहन प्रवास आहे.

 

* * *

पीआयबी मुंबई | सुवर्णा बेडेकर/राजश्री आगाशे/दर्शना राणे


Great films resonate through passionate voices. Share your love for cinema with #MIFF2026. Tag us @pibmumbai on X, and we'll help spread your passion! For journalists, bloggers, and vloggers wanting to connect with filmmakers for interviews/interactions, reach out to us at miff.mediadesk@pib.gov.in with the subject line: Take One with PIB.


रिलीज़ आईडी: 2275759   |   Visitor Counter: 10