राष्ट्रपती कार्यालय
मध्य प्रदेशात बेतुल येथे आयोजित ‘अध्यात्मिक जागृतीद्वारे आदिवासी समाजाचे सक्षमीकरण’ कार्यक्रमात राष्ट्रपतींचा सहभाग
विकास आणि पारंपरिक मूल्ये यांच्यातील समतोलातून एका सशक्त आणि समृध्द समाजाचा पाया घडतो
प्रविष्टि तिथि:
18 JUN 2026 8:23PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 जून 2026
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज दिनांक 18 जून 2026 रोजी मध्य प्रदेशात बेतुल येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयातर्फे आयोजित ‘अध्यात्मिक जागृतीद्वारे आदिवासी समाजाचे सक्षमीकरण’ या कार्यक्रमात सहभागी झाल्या.

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या की उपभोगवादी संस्कृतीच्या आहारी गेलेल्या आजच्या वेगवान जगात अध्यात्मिक शुद्धता ही समाजाच्या प्रत्येक घटकासाठी अत्यंत महत्त्वाची झाली आहे. त्यामुळे त्या पायाच्या आधारावर समतावादी आचारसंहिता तसेच नैसर्गिक साधनसंपत्तीप्रती संवेदनशील असलेली जीवनशैली उभारता येईल जी दीर्घकाळापर्यंत शाश्वत असेल. तणाव आणि संघर्षाने ग्रस्त असलेल्या सध्याच्या जगात, इतिहासात कधीही नव्हती इतकी याची जास्त गरज भासू लागली आहे असे त्या म्हणाल्या. अशा परिस्थितीत, ‘अध्यात्मिक जागृतीद्वारे आदिवासी समाजाचे सक्षमीकरण’ यांसारख्या परिषदा अधिक महत्त्वाच्या झाल्या आहेत असे मत त्यांनी नोंदवले.
राष्ट्रपती म्हणाल्या की आदिवासी समुदायांची जीवनशैली नैसर्गिकरीत्याच अध्यात्मिकतेच्या मुलभूत प्रेरणांना अनुसरून असते.

राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या की, भारतीय जीवन-मूल्यांनुसार काम करणाऱ्या कोणत्याही संघटनेला हे नेहमीच लक्षात ठेवावे लागते की समाजाच्या कोणत्याही घटकाचे सक्षमीकरण केवळ आर्थिक विकासापर्यंत सीमित राहू शकत नाही. जेव्हा एखादी व्यक्ती त्याच्या/तिच्या सामाजिक जबाबदाऱ्यांचे भान राखून आत्मविश्वास, आत्मसन्मान आणि जाणिवेसह काम करते तेव्हाच खरे सक्षमीकरण घडते असे मत राष्ट्रपतींनी व्यक्त केले. अध्यात्मिक जागृती व्यक्तींना त्यांच्या अंतर्गत सामर्थ्याची जाणीव करून देतानाच त्यांना सकारात्मक विचार आणि जीवनाच्या उच्च हेतूंशी जोडते.
राष्ट्रपती म्हणाल्या की विकास आणि पारंपरिक मूल्ये यांच्यातील समतोल हा सशक्त आणि समृद्ध समाजाचा पाया असतो. आपली मुळे आणि महत्त्वाची मूल्ये यांच्याकडून पोषण मिळवतो आणि त्याच वेळी त्यांना बळकटदेखील करतो असा विकास हा अर्थपूर्ण विकास असतो. जेव्हा आपण अशा समग्र दृष्टीकोनासह काम करू तेव्हा सुसंवाद आणि समानता यांचा एक मजबूत ओघ समाजामध्ये वाहत राहील. आणि तेव्हाच आपण समावेशक विकासासाठी नवे मापदंड स्थापित करू शकू.

जेथे अध्यात्मिकता, सामाजिक सुसंवाद, पर्यावरणाचे जतन आणि मानव कल्याण हे आपल्या समावेशक विकासाच्या कोनशीला म्हणून काम करतील असा विकसित भारत 2047 पर्यंत उभारण्याच्या मोठ्या कटिबद्धतेसह एकत्र येऊन काम करण्याचे आवाहन राष्ट्रपतींनी सर्वांना केले.
राष्ट्रपतींचे संपूर्ण भाषण मिळवण्यासाठी कृपया येथे क्लिक करा.
सोनाली काकडे/संजना चिटणीस/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2274871)
आगंतुक पटल : 19