पंतप्रधान कार्यालय
जी-7 शिखर परिषदे निमित्त पंतप्रधानांनी घेतली संयुक्त अरब अमिरातीच्या अध्यक्षांची भेट
Posted On:
17 JUN 2026 1:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 जून 2026
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज फ्रान्समधील एव्हियन इथे आयोजित, जी-7 शिखर परिषदेदरम्यान संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांची भेट घेतली. 2026 या वर्षभरातील, उभय नेत्यांची ही तिसरी भेट होती. ही भेट भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यातील दृढ आणि गतिमान 'सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी'चं प्रतीक आहे.
युएई चे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान जानेवारी, 2026 मध्ये भारत भेटीवर आले होते, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मे, 2026 मध्ये युएईचा दौरा केला होता. यात, तंत्रज्ञान, व्यापार, गुंतवणूक, उर्जा आणि संरक्षण आदी क्षेत्रांचा समावेश आहे. दोन्ही नेत्यांनी परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवरही विचार-विनिमय केला.
या भेटीदरम्यान, पश्चिम आशियात दीर्घकालीन शांतता, सुरक्षितता आणि स्थिरता प्रस्थापित करण्यासाठी संवाद यांचं महत्व असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी अधोरेखित करत, मुत्सद्देगिरी तसंच आंतरराष्ट्रीय कायदे, सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेचा एकात्मतेचा आदर करणं गरजेचे असल्याचे नमूद केले.
होर्मूझच्या सामुद्रधुनीतून विना अडथळा, सुरक्षित आवागमन आणि व्यापार सुरू ठेवण्याचे आवाहन दोन्ही पक्षांनी केले.
या वर्षाच्या अखेरीस भारतात होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधानांनी, युएईचे राष्ट्रपती शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांना आमंत्रित केले.
* * *
नाना मेश्राम/सविता म्हस्कर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2273916)
अभ्यागत कक्ष : 51
Read this releasein:
Gujarati
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam