नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
पवन ऊर्जेच्या विकासाला चालना देण्यासाठी 'नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय' गोव्यात 'जागतिक पवन ऊर्जा दिन 2026' परिषदेचे आयोजन करणार
केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या उपस्थितीत भारताच्या पवन ऊर्जेच्या महत्त्वाकांक्षांना गती देणाऱ्या महोत्सवाचे आयोजन
प्रविष्टि तिथि:
12 JUN 2026 5:09PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 जून 2026
नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने 15 जून 2026 रोजी गोव्यामध्ये जागतिक पवन ऊर्जा दिन 2026’ परिषदेचे आयोजन केले आहे. 'पवन ऊर्जा: महत्त्वाकांक्षेकडून वेगवान वाटचालीकडे', ही या परिषदेची संकल्पना आहे.
केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा आणि ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. केंद्रीय विद्युत प्राधिकरण, केंद्रीय विद्युत प्राधिकरण (सीईए), भारतीय सौर ऊर्जा महामंडळ (एसईसीआय), भारतीय नवीकरणीय ऊर्जा विकास एजन्सी (इरेडा), नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ विंड एनर्जी (एनआयडब्ल्यूई) ग्रिड इंडिया, प्रमुख राज्य सरकारे आणि इंडियन विंड टर्बाइन मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयडब्ल्यूटीएमए), डब्ल्यूआयपीपीए आणि आयडब्ल्यूपीए या उद्योग संघटनांचे वरिष्ठ प्रतिनिधी देखील या परिषदेला उपस्थित राहतील.
भारत, पवन ऊर्जेची जगातील चौथी सर्वात मोठी बाजारपेठ बनला आहे. 2030 पर्यंत 100 गिगावॅट आणि 2035 पर्यंत 155 गिगावॅटचे उद्दिष्ट लक्षात घेता, 2070 पर्यंत 500 गिगावॅट इतकी बिगर-जीवाश्म इंधन क्षमता आणि 'नेट-झिरो' (निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जन) उत्सर्जनाच्या भारताच्या उद्दिष्टपूर्तीमध्ये पवन ऊर्जा महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
“भारताच्या अक्षय ऊर्जा धोरणाच्या केंद्रस्थानी पवन ऊर्जा आहे आणि 2025-26 मधील 6.1 गिगावॅटची विक्रमी वाढ, मजबूत धोरण आणि उद्योग क्षेत्राच्या सहकार्याने काय साध्य होऊ शकते, हे दर्शवते. पवन ऊर्जा उत्पादनाच्या पुढील टप्प्याला गती देण्याची गरज आहे. जागतिक पवन ऊर्जा दिन 2026 च्या निमित्ताने, भारताने महत्त्वाकांक्षेकडून अंमलबजावणीकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे, कारण भारत जागतिक निर्यात संधींचा लाभ घेण्याच्या दृष्टीने सज्ज होत आहे." असे या परिषदेबाबत बोलताना केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले.
नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाचे सचिव संतोष कुमार सारंगी हे देखील या कार्यक्रमात सहभागी होतील. या परिषदेत भारताच्या पवन ऊर्जेच्या प्रवासातील पुढील टप्प्याला आकार देणाऱ्या प्रमुख प्राधान्यक्रमांवर चर्चा केली जाईल, यात पुरेशी संसाधने, ग्रीड सज्जता, क्षमतेमधील वाढ, देशांतर्गत उत्पादन स्पर्धात्मकता, निर्यात संधी आणि पूर्वानुमान आणि नवीकरणीय ऊर्जा पुरवठ्यातील सातत्य कायम राखण्याबाबत प्रगती, याचा समावेश असेल. या सोहळ्याचा एक भाग म्हणून, अनेक उद्योग अहवाल आणि विषय संबंधी शोध पत्र जारी केली जातील. यात ‘जागतिक बाजारपेठेसाठी भारताच्या पवन टर्बाइन निर्यातीला चालना देणे’, याचा समावेश आहे, जो पवन टर्बाइन उत्पादन आणि निर्यातीसाठी जागतिक केंद्र बनण्याची भारताची क्षमता अधोरेखित करतो.
वापराला गती देण्यासाठी, अंमलबजावणी सुधारण्यासाठी आणि देशांतर्गत क्षमता बळकट करण्यासाठी व्यावहारिक उपाय योजण्यासाठी, या परिषदेत सरकार, नियामक, विकासक, उत्पादक आणि तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण सत्रे आणि पॅनेल चर्चा आयोजित केल्या जातील. हे क्षेत्र विकासाच्या पुढील टप्प्यात प्रवेश करत असताना, जागतिक पवन ऊर्जा दिन 2026 हा शाश्वत विस्तार आणि स्वच्छ ऊर्जेच्या महत्त्वाकांक्षांसाठी पथदर्शी आराखडा तयार करण्यामध्ये एक महत्त्वाचा टप्पा म्हणून काम करेल.
सुषमा काणे/राजश्री आगाशे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2272214)
आगंतुक पटल : 18