पंतप्रधान कार्यालय
शेतकऱ्यांचे कल्याण, आधुनिक कृषी सुविधा आणि कृषी क्षेत्राचे सक्षमीकरण यासाठी सरकारची वचनबद्धता पंतप्रधानांनी केली अधोरेखित
Posted On:
11 JUN 2026 6:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 जून 2026
आपले शेतकरी बंधू आणि भगिनी देशाची अन्नसुरक्षा, पोषण आणि समृद्धीचे आधारस्तंभ असून, त्यांचे आयुष्य सुखकर बनण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अधोरेखित केले. 'प्रधानमंत्री किसान सम्मान निधी' तसेच 'पिक विमा योजना' यासारखे उपक्रम त्यांना उत्पन्नाची हमी मिळवून देत असून, शेतीला अधिक सक्षम करत आहेत असे सांगत, 'प्रधानमंत्री कुसुम योजना' सारख्या योजनांमुळे सौर उर्जा उपलब्ध होऊन, शेतीला लागणाऱ्या खर्चात बचत होत आहे असं त्यांनी नमूद केले.
शेतकरी, पशुपालक, मच्छिमार यांना, कमी व्याजावर सहज कर्ज उपलब्ध करून देण्यात 'किसान क्रेडीट कार्ड' अत्यंत फायदेशीर ठरत आहे असं त्यांनी सांगितलं. तर, 'बियाण्यापासून बाजारपेठेपर्यंत' हा उपक्रम शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव मिळवून देण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे,असे ते पुढे म्हणाले.
पंतप्रधान म्हणाले की, शेतकऱ्यांचं कल्याण यालाच आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे आणि म्हणूनच, त्यांना आधुनिक कृषी सुविधा उपलब्ध करून देण्यावर सातत्याने भर दिला जात आहे. ड्रोन, मृदा आरोग्य पत्रिका आणि नैसर्गिक खते यांच्याशी संबंधित मोहिमा, शेतकऱ्यांना पीक उत्पादकता वाढविण्यात सक्रियपणे मदत करत आहेत, हे त्यांनी अधोरेखित केले.
पंतप्रधानांनी एक्स या समाज माध्यमावर स्सामायिक केलेल्या संदेशांच्या मालिकेत पंतप्रधान म्हणतात :
"आपले शेतकरी बंधू आणि भगिनी हे राष्ट्राच्या अन्न सुरक्षा, पोषण आणि समृद्धीचे आधारस्तंभ आहेत. त्यांचे जीवन सुखकर करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. प्रधानमंत्री किसान सम्मान निधी आणि पिक विमा योजना यांसारखे अनेक उपक्रम त्यांना उत्पन्न सुरक्षा देण्याबरोबरच शेतीलाही अधिक सक्षम करत आहेत. प्रधानमंत्री -कुसुम योजनेमुळे त्यांना शेतीसाठी सौर ऊर्जा तर उपलब्ध झाली आहेच, शिवाय शेतीवर होणारा खर्चही कमी झाला आहे."
#12YearsOfKisanSamriddhi"
"किसान क्रेडिट कार्ड, शेतकरी, पशुपालक आणि मच्छीमार यांना शेती आणि इतर गरजांसाठी कमी व्याजदरात सुलभ कर्ज उपलब्ध करून देण्यात मदत करत आहे. 'बियाण्यापासून बाजारापर्यंत' हा आमचा उपक्रम देखील त्यांच्या पिकांना योग्य भाव मिळवून देण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरत आहे."
#12YearsOfKisanSamriddhi"
शेतकऱ्यांच्या कल्याणाला आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे आणि म्हणूनच, त्यांना आधुनिक कृषी सुविधा उपलब्ध करून देण्यावर सातत्याने भर दिला जात आहे. ड्रोन, मृदा आरोग्य पत्रिका आणि नैसर्गिक खते यांच्याशी संबंधित मोहिमा, शेतकऱ्यांना पीक उत्पादकता वाढविण्यात सक्रियपणे मदत करत आहेत.
#12YearsOfKisanSamriddhi"
* * *
निलिमा चितळे/सविता म्हस्कर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2271808)
अभ्यागत कक्ष : 53
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Bengali-TR
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam