संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय संरक्षणमंत्री 13 जून 26 रोजी दुंडीगलमधील हवाई दल अकादमी येथे संयुक्त दीक्षांत संचलनाची पाहणी करणार

प्रविष्टि तिथि: 09 JUN 2026 5:21PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 जून 2026

हैदराबादमध्ये दुंडीगल येथील हवाई दल अकादमीत (एएफए) दिनांक 13 जून 26 रोजी 217 अभ्यासक्रमांचे संयुक्त दीक्षांत संचलन (सीजीपी) होणार आहे. लष्कराच्या अचूकतेचे दर्शन घडवणारा हा कार्यक्रम, भारतीय हवाई दलाच्या विविध अभ्यासक्रम शाखांतील फ्लाईट कॅडेट्सच्या नेमणूक-पूर्व प्रशिक्षणाच्या यशस्वी पूर्ततेनिमित्त आयोजित करण्यात आला आहे. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह या संचालनाचे पाहणी अधिकारी (रिव्ह्यूईंग ऑफिसर-आरओ) म्हणून उपस्थित असतील.

सदर समारंभादरम्यान, पदवीधारक प्रशिक्षणार्थींना आरओ राजनाथ सिंह यांच्या हस्ते ‘प्रेसिडेंट्स कमिशन’ म्हणजेच राष्ट्रपतींच्या आदेशाद्वारे थेट अधिकारी म्हणून नियुक्ती देण्यात येईल. या समारंभामध्ये आयएएफचे फ्लाईट कॅडेट्स, भारतीय नौदल, भारतीय तटरक्षक दल आणि व्हिएतनाम सोश्यालिस्ट प्रजासत्ताकाचे अधिकारी आणि प्रशिक्षणार्थी यांना प्रशिक्षणाच्या यशस्वी पूर्ततेनिमित्त ‘विंग्स’ तसेच ‘ब्रेव्हेट्स’ प्रदान करण्यात येतील. या सीजीपीमध्ये पुण्याच्या राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एनडीए) मधून दिनांक 30 मे 2025 रोजी उत्तीर्ण झालेल्या आणि शाखा विशिष्ट प्रशिक्षणासाठी एएफएमध्ये प्रवेश घेतलेल्या महिला कॅडेट्सच्या पहिल्या तुकडीची नियुक्ती देखील होणार आहे.

हवाई उड्डाण, दिशादर्शन संचार शाखा तसेच कार्यालयीन कर्तव्य या तिन्ही शाखांमधील गुणवत्तेच्या एकंदर क्रमानुसार प्रथम आलेल्या फ्लाईट कॅडेट्सना या कार्यक्रमात आरओ यांच्या हस्ते ‘प्रेसिडेंट्स प्लाक’ प्रदान करण्यात येईल. या कार्यक्रमात सीजीपीच्या प्रारंभानिमित्त आकाश गंगा आणि एअर वॉरीयर टीम (एडब्ल्यूडीटी) तर्फे हवाई कसरतींचे प्रदर्शन करण्यात येईल आणि त्यामध्ये हवाई दल प्रमुख (सीएएस) एअर मार्शल एपी सिंग यांच्या नेतृत्वाखालील विमानांची संचलन-उड्डाणे देखील होतील. यामध्ये पिलाटस पीसी-7 एमकेआयआय, हॉक, किरण आणि चेतक या चार प्रकारच्या प्रशिक्षणार्थी विमानांद्वारे संचलन उड्डाणे होतील. तसेच  एसयू-30 एमकेआय, सारंग हेलिकॉप्टर प्रदर्शन पथक आणि सूर्यकिरण हवाई कसरती पथक (एसकेएटी) यांनी केलेल्या हवाई कसरती हे या समारंभाचे मुख्य आकर्षण असणार आहे.

भारतीय हवाई दलाच्या समाज माध्यम हँडल्सवर तसेच डीडी नॅशनल वाहिनीवर दिनांक 13 जून 26 रोजी सकाळी 7 वाजल्यापासून या कार्यक्रमाचे थेट प्रसारण होणार आहे.


नितीन फुल्लुके /संजना चिटणीस/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2270791) आगंतुक पटल : 13
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Gujarati , Tamil