वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

जागतिक व्यापार संघटनेने आयोजित केलेल्या व्यापार आणि पर्यावरण सप्ताह 2026 मध्ये भारताने 'कार्बन क्रेडिट व्यापार योजना आणि अक्षय ऊर्जा मानकीकरण यांसारख्या उपक्रमांचे केले सादरीकरण


जागतिक व्यापार संघटनेच्या कार्यक्रमात भारताने शाश्वत विकास आणि स्वच्छ ऊर्जा संक्रमण विषयक प्रयत्नांवर दिला भर

प्रविष्टि तिथि: 05 JUN 2026 8:29PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 5 जून 2026

 

जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने जागतिक व्यापार संघटनेने जिनेव्हा येथे आयोजित केलेल्या व्यापार आणि पर्यावरण सप्ताह 2026 मध्ये भारताने कार्बन क्रेडिट व्यापार योजना आणि  अक्षय  ऊर्जा मानकीकरण यांसारख्या विशेष उपक्रमांचे सादरीकरण केले.  

या कार्यक्रमात भारताने आपले  शाश्वत विकास प्रयत्न , स्वच्छ ऊर्जा संक्रमण आणि पॅरिस कराराअंतर्गत आपल्या राष्ट्रीय स्तरावर निश्चित योगदानांच्या पूर्ततेसाठी केलेल्या उपक्रमांवर विशेष भर दिला. या सत्रात भारताच्या कमी कार्बन उत्सर्जन अर्थव्यस्थेच्या दिशेने सुरु असलेल्या संक्रमणाला चालना देण्यासाठी सुरु असलेल्या महत्त्वपूर्ण धोरणात्मक आणि नियामक उपक्रमांचे सादरीकरण करण्यात आले.

या कार्यक्रमात पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय, ऊर्जा कार्यक्षमता ब्युरो, ऊर्जा मंत्रालय आणि नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी आणि तज्ञ व्यक्तींनी सादरीकरण केले.

भारत आपल्या निश्चित मुदतीच्या आधीच हवामान बदल विषयक उद्दिष्टे साध्य करत असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. मार्च 2026 च्या आकडेवारीनुसार, भारतने बिगर जीवाष्म आधारित स्थापित ऊर्जा निर्मिती क्षमतेत 2030 पर्यंत निर्धारित केलेल्या 50 टक्क्यांच्या तुलनेत 53.21 टक्के इतके उद्दिष्ट साध्य केले असून हे उद्दिष्ट मुदतीच्या पाच वर्षे आधीच गाठले आहे. त्याचप्रमाणे, भारताच्या जीडीपीच्या उत्सर्जन तीव्रतेत 2005 ते 2022 या कालावधीत 37.38 टक्क्यांची घट झाली आहे. त्यामुळे 2030 पर्यंत 33–35 टक्के घट साध्य करण्याचे राष्ट्रीय स्तरावर निश्चित योगदान उद्दिष्ट भारताने निर्धारित वेळेच्या खूप आधीच पूर्ण केले आहे.

याशिवाय राष्ट्रीय हरित हायड्रोजन अभियानाअंतर्गत  भारताने साध्य केलेल्या प्रगतीचा आलेख देखील यावेळी मांडण्यात आला, यामध्ये हायड्रोजनचे वर्गीकरण हरित हायड्रोजन म्हणून करण्यासाठी अधिसूचित करण्यात आलेल्या उत्सर्जनाच्या मर्यादा आणि तांत्रिक निकष याबाबत माहिती देण्यात आली. या मानकांचा उद्देश उत्पादक, गुंतवणूकदार आणि ग्राहकांना पारदर्शकता, विश्वासार्हता आणि निश्चितता प्रदान करण्यासाठी तसेच हरित हायड्रोजन व्यवस्थेच्या अभूतपूर्व विस्ताराला पाठबळ देणे हा आहे.

 

* * *

राधिका अघोर/भक्‍ती सोनटक्‍के/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2269533) आगंतुक पटल : 13
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Malayalam