जलशक्ती मंत्रालय
केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांच्या हस्ते स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिम आणि घनकचरा व्यवस्थापन नियम 2026 संदर्भातील राष्ट्रीय जनजागृती मोहिमेचा शुभारंभ
Posted On:
01 JUN 2026 10:23PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 जून 2026
केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांनी आज नवी दिल्ली येथे जलशक्ती मंत्रालयाच्या पेयजल आणि स्वच्छता विभागात स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायू मोहीम आणि घनकचरा व्यवस्थापन नियम, 2026 बाबत जनजागृती करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील आयईसी मोहिमेचा शुभारंभ केला. मिश्र स्वरूपात आयोजित या कार्यक्रमाला पेयजल आणि स्वच्छता विभागाचे सचिव अशोक के. के. मीना, सहसचिव आणि मिशन संचालक, एसबीएम(जी) ऐश्वर्या सिंग आणि पेयजल आणि स्वच्छता विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु ही मोहीम पेयजल आणि स्वच्छता विभागाची जागतिक पर्यावरण दिन 2026 निमित्त राबविण्यात येणारी मोहीम असून ती पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय यांच्या सहकार्याने सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेची अंमलबजावणी 1 जून ते 5 जून 2026 या कालावधीत करण्यात येणार असून, त्यापूर्वी 25 मे ते 29 मे 2026 या कालावधीत अंमलबजावणी-पूर्व टप्पा राबविण्यात आला आहे.
ही मोहीम मिशन लाइफ, वर्तनातील सकारात्मक बदल आणि पर्यावरण संरक्षण या विषयांबाबत जनजागृती करण्यावर केंद्रित आहे. स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) 2.0 हे प्लास्टिक कचरा व्यवस्थापनातील 4 आर (नाकारणे, कमी करणे, पुनर्वापर, पुनर्चक्रण), सांडपाणी व्यवस्थापनातील 3 आर (कमी करणे, पुनर्वापर, पुनर्भरण) तत्त्वे आणि चक्राकार अर्थव्यवस्थेला चालना देणे तसेच कचऱ्यापासून संसाधन निर्मितीला प्रोत्साहन देऊन मिशन लाइफच्या उद्दिष्टांना पाठबळ देते. तसेच, गावांचे ओडीएफ प्लस (मॉडेल) गावांमध्ये रूपांतर करण्याचे उद्दिष्टही या मिशनद्वारे साध्य केले जात आहे.


1 एप्रिल 2026 पासून लागू झालेल्या घनकचरा व्यवस्थापन नियम, 2026 बाबत जनजागृती आणि संवेदनशीलता निर्माण करणे हा स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेचा आणखी एक महत्त्वाचा उद्देश आहे.
या मोहिमेमध्ये विविध नियोजित उपक्रमांचा समावेश असेल आणि 5 जून 2026 रोजी एक पेड माँ के नाम वृक्षारोपण मोहीम आणि विशेष ग्रामसभेसह या मोहिमेचा समारोप होईल; या सभेत सर्व ग्रामपंचायतींकडून मोहिमेतील कामगिरी आणि घनकचरा व्यवस्थापन नियम, 2026 बाबत जनजागृतीपर चर्चा केली जाईल.


* * *
सुषमा काणे/राज दळेकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2267744)
अभ्यागत कक्ष : 18