भारतीय निवडणूक आयोग
azadi ka amrit mahotsav

राज्य सभा आणि राज्य विधान परिषदा 2026 च्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर


नामनिर्देशनपत्रे भरण्याचे काम सुरु

Posted On: 01 JUN 2026 5:32PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 1 जून 2026

 

1. भारतीय निवडणूक आयोगाने (ईसीआय) तीन राज्यांतील विधान परिषदांच्या (आमदारांतर्फे होणाऱ्या) द्वैवार्षिक पक्षीय आणि पोटनिवडणुकांसह राज्यसभेच्या 27 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. 

2. कार्यक्रमाचे तपशील खालील तक्त्यात दिले आहेत:

कायदेमंडळ

निवडणुकीचा प्रकार

राज्ये

जागा

राज्यसभा

द्वैवार्षिक निवडणूक

10 राज्ये*

24

राज्यसभा

पोटनिवडणूक

महाराष्ट्र

1

राज्यसभा

पोटनिवडणूक

तमिळनाडू

1

राज्यसभा

पोटनिवडणूक

ओदिशा

1

राज्य विधान परिषदा (आमदारांच्या तर्फे)

द्वैवार्षिक निवडणूक

बिहार

9

राज्य विधान परिषदा (आमदारांच्या तर्फे)

द्वैवार्षिक निवडणूक

कर्नाटक

7

राज्य विधान परिषदा (आमदारांच्या तर्फे)

पोटनिवडणूक

बिहार

1

राज्ये: आंध्रप्रदेश, गुजरात, झारखंड, मध्यप्रदेश, मणिपूर, मेघालय, राजस्थान, अरुणाचल प्रदेश, कर्नाटक आणि मिझोरम

 

3. निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रमाबद्दल अधिसूचना जारी केली आहे आणि निवडणूक अधिकारी तसेच सहाय्यक निवडणूक अधिकारी (द्वैवार्षिक निवडणुका आणि पोटनिवडणुका या दोन्हींसाठी) यांची नेमणूक केली आहे. नेमणुकांचे तपशील भारतीय राजपत्र/राज्य राजपत्रात जाहीर करण्यात आले आहेत.

4. याबरोबरच आज दिनांक 01 जून 2026 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून, वर उल्लेख केलेल्या सर्व निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रे भरायची सुरुवात झाली. अर्ज सादर करण्याची मुदत 08 जून 2026 रोजी दुपारी 3 वाजता संपेल.

5. दिनांक 09 जून 2026 रोजी निवडणूक अधिकारी (आरओज) या सर्व निवडणुकांसाठी सादर झालेल्या अर्जांची छाननी करतील. अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 11 जून 2026 आहे.

6. निवडणुका झाल्या तर त्यांचे मतदान दिनांक 18 जून 2026 रोजी सकाळी 8 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत होईल आणि त्यानंतर दुपारी 5 वाजता या सर्व निवडणुकांसाठी मतमोजणी करण्यात येईल.

 

* * *

राधिका अघोर/संजना चिटणीस/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2267595) अभ्यागत कक्ष : 38