पंतप्रधान कार्यालय
प्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
प्रविष्टि तिथि:
01 JUN 2026 2:07PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 जून 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकप्रिय गायिका सुमन कल्याणपूर यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
सुमन कल्याणपूर यांच्या जाण्याने अत्यंत दुःख झाले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सुमन कल्याणपूर यांच्या सुमधुर आवाजाने आणि भावपूर्ण गायकीने भारताचे सांस्कृतिक क्षेत्र अधिक समृद्ध केले, तसेच आपल्या गाण्यांच्या माध्यमातून त्यांनी संगीतप्रेमी आणि भारतीय चित्रपटाच्या चाहत्यांच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केले, अशा भावना पंतप्रधानांनी व्यक्त केल्या.
'एक्स' या समाज माध्यमावरच्या पोस्ट मध्ये पंतप्रधान म्हणतात,
"लोकप्रिय गायिका सुमन कल्याणपूर जी यांच्या निधनामुळे अत्यंत दुःख झाले आहे. त्यांच्या सुमधुर आवाजाने आणि भावपूर्ण गायकीने आपल्या सांस्कृतिक क्षेत्राला समृद्ध केले. त्यांनी आपल्या गाण्यांमधून संगीतप्रेमी आणि भारतीय चित्रपटाच्या चाहत्यांच्या मनात एक हक्काचे व विशेष स्थान निर्माण केले होते. त्यांच्या कुटुंबियांच्या आणि चाहत्यांच्या दुःखात मी सहभागी आहे. ओम शांती."
* * *
नेहा कुलकर्णी/वैभवी जोशी/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2267451)
आगंतुक पटल : 69
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Bengali-TR
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam