संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

ॲडमिरल कृष्ण स्वामिनाथन, पीव्हीएसएम, एव्हीएसएम, व्हीएसएम यांनी भारतीय नौदलाचे 27 वे नौदल प्रमुख (चीफ ऑफ द नेव्हल स्टाफ) म्हणून स्वीकारला पदभार

Posted On: 31 MAY 2026 4:27PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 31 मे 2026

ॲडमिरल कृष्ण स्वामिनाथन, पीव्हीएसएम, एव्हीएसएम, व्हीएसएम यांनी 31 मे 2026 रोजी भारतीय नौदलाचे 27 वे नौदल प्रमुख (चीफ ऑफ द नेव्हल स्टाफ) म्हणून पदभार स्वीकारला. त्यांची ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी, पीव्हीएसएम, एव्हीएसएम,एन एम यांच्या जागी नियुक्ती झाली आहे. त्रिपाठी 41 वर्षांच्या गौरवशाली सेवेनंतर सेवानिवृत्त झाले आहेत.

ॲडमिरल कृष्ण स्वामिनाथन हे 01 जुलै 1987 रोजी भारतीय नौदलात नियुक्त झाले होते. संचार आणि इलेक्ट्रॉनिक युद्धकला (कम्युनिकेशन्स आणि इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर) क्षेत्रातील तज्ञ असलेल्या स्वामिनाथन यांनी जवळपास चार दशकांच्या आपल्या उत्कृष्ट कारकिर्दीत विविध प्रकारच्या ऑपरेशनल, स्टाफ आणि प्रशिक्षण जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. ॲडमिरल स्वामिनाथन यांच्या सागरी कमांड्समध्ये 'आय एन एस' विद्युत आणि 'आय एन एस' विनाश या मार्गदर्शित क्षेपणास्त्र नौका, मार्गदर्शित क्षेपणास्त्र कॉर्व्हेट 'आय एन एस' कुलिश, मार्गदर्शित क्षेपणास्त्र विनाशिका 'आय एन एस' म्हैसूर आणि विमानवाहू युद्धनौका 'आय एन एस' विक्रमादित्य यांचा समावेश आहे.

रिअर ॲडमिरल  पदावर पदोन्नती झाल्यानंतर, त्यांनी कोची येथील दक्षिण नौदल कमांडच्या मुख्यालयात  चीफ स्टाफ ऑफिसर (ट्रेनिंग) म्हणून काम केले. त्यानंतर त्यांची फ्लॅग ऑफिसर सागरी प्रशिक्षण, म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि नंतर त्यांनी भारतीय नौदलाची तलवार मानल्या जाणाऱ्या 'वेस्टर्न फ्लीटचे नेतृत्व केले. यानंतर, त्यांची फ्लॅग ऑफिसर ऑफशोअर डिफेन्स ॲडव्हायझरी ग्रुप आणि भारत सरकारचे ॲडव्हायझर, ऑफशोअर सिक्युरिटी अँड डिफेन्स' म्हणून नियुक्ती करण्यात आली.

व्हाइस ॲडमिरल पदावर पदोन्नती झाल्यानंतर, त्यांनी पश्चिम नौदल कमांड चे चीफ ऑफ स्टाफ; आणि नौदल मुख्यालयात कंट्रोलर पर्सनल सर्व्हिसेस, चीफ ऑफ पर्सनल आणि व्हाइस चीफ ऑफ द नेव्हल स्टाफ या पदांवर काम केले. नौदल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारण्यापूर्वी, ॲडमिरल स्वामिनाथन हे प्रतिष्ठित पश्चिम नौदल कमांड चे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन चीफ होते.

ते राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए), खडकवासला; जॉइंट सर्व्हिसेस कमांड अँड स्टाफ कॉलेज, श्रिव्हनहॅम, युनायटेड किंगडम; कॉलेज ऑफ नेव्हल वॉरफेअर कारंजा; आणि युनायटेड स्टेट्स नेव्हल वॉर कॉलेज, न्यूपोर्ट, रोड आयलंडचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांच्या शैक्षणिक पात्रतेमध्ये जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू), नवी दिल्ली येथून 'बीएससी' पदवी; कोचीन युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी (सीयूएसएटी)), कोची येथून टेलिकम्युनिकेशन्समध्ये 'एमएससी'; 'कींग्ज काॅलेज', लंडन येथून डिफेन्स स्टडीजमध्ये 'एमए'; मुंबई विद्यापीठातून  स्ट्रॅटेजिक स्टडीजमध्ये 'एम फीलl'; आणि मुंबई विद्यापीठातूनच  इंटरनॅशनल स्टडीजमध्ये 'पीएचडी' चा समावेश आहे

ॲडमिरल कृष्ण स्वामिनाथन यांना त्यांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल परम विशिष्ट सेवा पदक (पीव्हीएसएम), अति विशिष्ट सेवा पदक (एव्हीएसएम) आणि विशिष्ट सेवा पदक (व्हीएसएम) देऊन गौरवण्यात आले आहे.
 


राधिका अघोर/आशुतोष सावे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2267253) अभ्यागत कक्ष : 16