पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी वीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त केले त्यांचे स्मरण
पंतप्रधानांनी एक संस्कृत सुभाषितही सामायिक केले
प्रविष्टि तिथि:
28 MAY 2026 11:40AM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 मे 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वीर सावरकर त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे स्मरण केले आणि त्यांचे धैर्य, राष्ट्रभक्ती आणि सामाजिक सुधारणेसाठी त्यांना आदरांजली वाहिली.
पंतप्रधानांनी म्हटले आहे की, एक महान क्रांतीकारी आणि आणि प्रख्यात राष्ट्रवादी विचारवंत आपले शौर्य, बुद्धिमत्ता आणि प्रखर देशभक्तीच्या विचारांनी देशाच्या प्रत्येक पिढीला सतत प्रेरणा देत राहतील.
पंतप्रधानांनी एक संस्कृत सुभाषित सामायिक केले:
“अनन्तोद्भूतभूतौघसङ्कुले भूतलेऽखिले।
शस्त्रे शास्त्रे त्रिचतुराश्चतुरा यदि मादृशाः।।”
या सुभाषिताचा अर्थ असा आहे की, या जगात अनेक लोक केवळ ज्ञान किंवा सामर्थ्यामुळे ओळखले जातात; परंतु असे शांत आणि महान व्यक्तिमत्त्व खरोखरच दुर्मिळ असते, ज्यांच्या ठायी बुद्धीमत्ता आणि पराक्रम या दोन्ही गुणांचा संगम झालेला असतो.
पंतप्रधानांनी आपल्या एक्स या समाजमाध्यमावरील पोस्टमध्ये म्हटले की,
"वीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे स्मरण. त्यांचे शौर्य आणि देशभक्ती लोकांना सदैव प्रेरणा देत राहील. त्यांची बुद्धिमत्ता आणि समाजसुधारणेला त्यांनी दिलेले महत्त्व विशेषत्वाने नमूद करण्यासारखे आहे."
* * *
हर्षल आकुडे/राजेश शिरभाते/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2266144)
आगंतुक पटल : 58
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Bengali-TR
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam