शिक्षण मंत्रालय
शिक्षण मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागाने राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार (उच्च शिक्षण संस्था आणि पॉलिटेक्निक) 2026 साठी नामांकने मागविली
Posted On:
27 MAY 2026 8:46PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 मे 2026
शिक्षण मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागाकडून राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार (उच्च शिक्षण संस्था आणि पॉलिटेक्निक) 2026 साठी राष्ट्र्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in द्वारे नामांकन मागविण्यात आले आहेत. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई) या पुरस्कारांसाठी संस्थात्मक भागीदार असणार आहे.
हे पुरस्कार तांत्रिक आणि बिगर-तांत्रिक उच्च शिक्षण संस्था तसेच पॉलिटेक्निकमधील उत्कृष्ट शिक्षक/प्राध्यापकांना प्रदान करण्यात येणार आहेत.
विभाग
विभाग I : उच्च शिक्षण संस्थांतील शिक्षक
खालील व्यापक विषयांनुसार तीन उपश्रेणी असतील :
उपश्रेणी (i) : अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, वास्तुकला इत्यादी
उपश्रेणी (ii) : मुलभूत विज्ञान, गणित, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र, वैद्यकशास्त्र, फार्मसी इत्यादी
उपश्रेणी (iii) : कला व समाजशास्त्र, मानवविद्या, भाषा, विधी अध्ययन, वाणिज्य, व्यवस्थापन इत्यादी
विषयांची ही यादी केवळ सूचक असून उच्च शिक्षणाशी संबंधित इतर विषय किंवा उदयोन्मुख ज्ञानक्षेत्रांचाही समावेश असेल.
श्रेणी II : पॉलिटेक्निक संस्थांतील शिक्षक
हा पुरस्कार पॉलिटेक्निक संस्थांतील उत्कृष्ट शिक्षक/प्राध्यापकांना प्रदान करण्यात येईल.
हा पुरस्कार देशातील महाविद्यालये, विद्यापीठे, उच्च शिक्षण संस्था आणि पॉलिटेक्निकमधील नियमित शिक्षकांसाठी खुला आहे, जे निर्धारित पात्रता निकष पूर्ण करतात. अर्जदारांकडे पदवी आणि/किंवा पदव्युत्तर स्तरावर किमान पाच वर्षांचा पूर्णवेळ अध्यापनाचा अनुभव असावा आणि नामांकन सादर करण्याच्या अंतिम तारखेपर्यंत त्यांचे वय 55 वर्षांपेक्षा अधिक नसावे.
कुलगुरू, संचालक आणि प्राचार्य, नियमित अथवा प्रभारी असले तरी, अर्जासाठी पात्र नसतील. मात्र, यापूर्वी अशा पदांवर कार्य केलेले आणि सध्या सेवेत असलेल्या 55 वर्षांखालील व्यक्ती अर्ज करू शकतात.
नामांकन पद्धती (जनभागीदारी तत्त्वावर ऑनलाइन पद्धतीने)
स्व-नामांकन
संस्थात्मक नामांकन : उच्च शिक्षण संस्था/पॉलिटेक्निक प्रमुखांमार्फत (संचालक/प्राचार्य/कुलगुरू)
सहकारी नामांकन : संबंधित विद्यापीठ/संस्था/महाविद्यालय/पॉलिटेक्निकमधील सहकाऱ्यांमार्फत
सर्व नामांकने राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल awards.gov.in वर निर्धारित नमुन्यात सादर करावीत :
नामांकन सादर करण्याची अंतिम तारीख:
05.07.2026
अधिक माहितीसाठी संपर्क :
ई-मेल :helpdesknataward26@aicte-india.org
दूरध्वनी : 011-29581051 / 011-295811236
(सकाळी 9.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत)
सोनाली काकडे/राज दळेकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2266057)
अभ्यागत कक्ष : 17