संरक्षण मंत्रालय
लष्करी रूग्णालयामध्ये (आर अँड आर) मध्ये प्रगत कर्करोग उपचारांसाठी आधुनिक रेडिओथेरपी तंत्रज्ञान कार्यान्वित
Posted On:
25 MAY 2026 1:18PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 मे 2026
दिल्ली येथील लष्करी रूग्णालय (रिसर्च अँड रेफरल) च्या ‘रेडिएशन ऑन्कोलॉजी’ विभागात आज (25 मे,2026) संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांच्या उपस्थितीत रिंग गँट्री आधारित ‘लिनियर ॲक्सिलरेटर’ उपचार यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. या प्रगत तंत्रज्ञानामुळे लष्करी रूग्णालयामधील कर्करोग उपचार सेवा अधिक मजबूत करेल. यामुळे कार्यरत जवान, निवृत्त सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी प्रगत रेडिओथेरपीची उपलब्धता होईल. यामुळे रुग्णालयामध्ये सेवा घेणाऱ्या मोठ्या रुग्णसंख्येसाठी अंतर्गत उपचार क्षमता वाढेल, अशी अपेक्षा आहे.
या ‘लिनियर ॲक्सिलरेटर व्हॉल्युमेट्रिक मॉड्युलेटेड आर्क थेरपी, इंटेन्सिटी-मॉड्युलेटेड रेडिएशन थेरपी, इमेज-गाईडेड रेडिएशन थेरपी, स्टीरिओटॅक्टिक बॉडी रेडिएशन थेरपी आणि स्टीरिओटॅक्टिक रेडिओसर्जरी यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने रेडिओथेरपी देण्यास सक्षम आहे. यामुळे शरीरामध्ये ज्या भागामध्ये कर्करोगाचा प्रसार झाला आहे, त्या आसपासच्या सामान्य उतींना होणारा धोका कमी करून, ट्यूमरच्या ठिकाणी अचूकपणे रेडिएशन पोहोचवणे शक्य होते. यामुळे उपचारांचे चांगले परिणाम दिसून येतात आणि रुग्णसेवेसाठी मदत होते.
सशस्त्र दल वैद्यकीय सेवा (एएफएमएस) अंतर्गत लिनियर ॲक्सिलरेटरची खरेदी केल्यामुळे,आता पूर्वीच्या उपकरणांच्या तुलनेत एक मोठी सुधारणा घडून आणली आहे. या समावेशामुळे एएफएमएसमधील ‘ऑन्कोलॉजी’ सेवांच्या आधुनिकीकरणाच्या दिशेने एक पाऊल टाकले गेले आहे. एएफएमएसअंतर्गत इतर ऑन्कोलॉजी केंद्रांचेही टप्प्याटप्प्याने आधुनिकीकरण केले जात आहे.
याप्रसंगी एएफएमएसचे डीजी सर्जन व्हाईस ॲडमिरल आरती सरिन; कमांडंट, आर्मी हॉस्पिटल (आर अँड आर) लेफ्टनंट जनरल अविनाश दास आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
IZSW.jpeg)
VY92.jpeg)
D89A.jpeg)
नेहा कुलकर्णी/सुवर्णा बेडेकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2264925)
अभ्यागत कक्ष : 13