निती आयोग
नीती आयोगाकडून उच्चाधिकार प्राप्त 'शिक्षण ते रोजगार व उद्योजकता' स्थायी समितीच्या पहिल्या बैठकीचे आयोजन
प्रविष्टि तिथि:
24 MAY 2026 5:37PM by PIB Mumbai
अर्थमंत्र्यांनी 2026-27 च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये युवा भारताच्या आकांक्षापूर्तीसाठी आणि क्षमता उभारण्याच्या शासनाच्या कटिबद्धतेवर विशेषतः सेवा क्षेत्रावर विशेष भर दिला होता. केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27च्या 51व्या परिच्छेदामध्ये शिक्षण ते रोजगार आणि उद्योजकता या विषयासाठी एक उच्चाधिकार स्थायी समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडला होता.
या संदर्भात नीती आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे; ज्यामध्ये संबंधित मंत्रालये/विभाग, राज्य सरकारे, उद्योग संघटना आणि तज्ज्ञ/अभ्यासक यांचा समावेश आहे.
22 मे 2026 रोजी नीती आयोगाने नीती आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधी छिब्बर यांच्या अध्यक्षतेखाली या स्थायी समितीची पहिली बैठक आयोजित केली होती.
नीती आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधी छिब्बर यांनी शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगार या क्षेत्रांतील व्यवस्थांना अर्थव्यवस्थेच्या सतत बदलत्या गरजांशी सुसंगत करण्याच्या दिशेने सुरू असलेल्या प्रयत्नांचे महत्त्व अधोरेखित केले. भारताची लोकसंख्या शास्त्रीय लाभांशाची स्थिती तरुणांसाठी उत्पादन रोजगार आणि उद्योजकीय संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने योग्य धोरणात्मक उपाययोजना राबवून आर्थिक विकासाचा वेग वृद्धींगत करण्याची संधी उपलब्ध करून देते असे त्यांनी सांगितले.
या चर्चेमध्ये श्रमशक्तीचा सहभाग, युवक रोजगार, शिक्षण आणि कौशल्य समन्वय, औपचारिक आणि अनौपचारिक अर्थव्यवस्था आणि नोकऱ्यांसाठी मनुष्यबळाची सज्जता यांसह विविध विषयांचा समावेश होता.
समितीने नियमित अंतराने बैठका घेण्याचा आणि रोजगार क्षमता वृद्धी, उद्योजकतेला चालना देणे, उद्योग-संबंधित कौशल्य विकास बळकट करणे आणि सेवा क्षेत्रातील वाढीला गती देणे यांसाठी कृतीयोग्य शिफारशी ओळखण्यावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताच्या लोकसंख्याशास्त्रीय लाभांशाचे विकास लाभांशामध्ये रूपांतर करणे, केंद्र, राज्ये, उद्योग, शिक्षण संस्था आणि कौशल्य विकास परिसंस्था यांच्यात समन्वित कृती वाढवणे आणि शिक्षण, रोजगार आणि उद्योजता यांच्यातील दरी भरून काढण्यासाठी भविष्यातील सज्जतेसाठी धोरणात्मक प्रतिसाद विकसित करणे या सामायिक वचनबद्धतेसह या बैठकीचा समारोप करण्यात आला.
***
सुषमा काणे/विजयालक्ष्मी साळवी साने/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2264815)
आगंतुक पटल : 63