पंतप्रधान कार्यालय
रोजगार मेळा अंतर्गत, पंतप्रधान 23 मे रोजी सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नव्याने नियुक्त झालेल्या तरुणांना 51,000 हून अधिक नियुक्तीपत्रे वितरित करणार
Posted On:
22 MAY 2026 4:07PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 मे 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी 23 मे 2026 रोजी सकाळी 11 वाजता 19 व्या रोजगार मेळाव्यात विविध सरकारी विभाग आणि संस्थांमधील नवनियुक्त तरुणांना दूरदृश्य प्रणालीद्वारे 51,000 हून अधिक नियुक्तीपत्रे वितरित करतील. ते या प्रसंगी उपस्थितांना संबोधितही करतील.
रोजगार निर्मितीला प्राधान्य देण्याप्रति पंतप्रधानांच्या वचनबद्धतेनुसार, रोजगार मेळा हा या कल्पनेला प्रत्यक्षात उतरवण्याच्या उद्देशाने सुरू केलेला एक प्रमुख उपक्रम आहे. रोजगार मेळावे सुरु केल्यापासून, आतापर्यंत देशभरात आयोजित 18 रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून सुमारे 12 लाख नियुक्ती पत्रे वितरित करण्यात आली आहेत.
19 वा रोजगार मेळावा देशभरातील 47 ठिकाणी आयोजित केला जाईल. भारताच्या सर्व भागांतून निवडलेले नवनियुक्त उमेदवार, रेल्वे मंत्रालय, गृह मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, वित्तीय सेवा विभाग, उच्च शिक्षण विभाग यांसारख्या भारत सरकारच्या विविध मंत्रालये आणि विभागांमध्ये रुजू होतील.
* * *
शैलेश पाटील/सुषमा काणे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2264146)
अभ्यागत कक्ष : 95
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali-TR
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam