युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
डोपिंग विरोधी कायद्यातील प्रस्तावित सुधारणा सार्वजनिक विचारविनिमयासाठी प्रकाशित
प्रस्तावित चौकटीत खेळाडूंना फौजदारी खटल्यापासून मिळणार संरक्षण
युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने सार्वजनिक सल्लामसलतीद्वारे लाभधारकांकडून मागवल्या सूचना
डोपिंगशी संबंधित तस्कर, बेकायदेशीर पुरवठादार, संघटित टोळ्या आणि त्याला सहाय्य करणारे भ्रष्ट कर्मचारी, यांना लक्ष्य करण्याचे प्रस्तावित तरतुदींचे उद्दिष्ट
Posted On:
21 MAY 2026 3:17PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 मे 2026
युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने डोपिंग, अर्थात उत्तेजक (अंमली पदार्थ) सेवनाच्या कृत्याला गुन्हेगारीच्या व्याख्येत समाविष्ट करण्याबाबतच्या प्रस्तावित सुधारणांवर लाभधारकांबरोबर सल्लामसलत करण्यासाठी आणि त्यांचे अभिप्राय मिळवण्यासाठी, त्या प्रकाशित केल्या आहेत.
कार्यक्षमता वाढवणाऱ्या प्रतिबंधित पदार्थांची आणि पद्धतींची तस्करी, बेकायदेशीर पुरवठा, वापर आणि व्यावसायिक वितरण यामध्ये गुंतलेल्या वाढत्या संघटित व्यवस्थेला आळा घालणे, ही प्रस्तावित चौकटीचे उद्दिष्ट आहे.
प्रतिबंधित पदार्थ आणि पद्धतींची तस्करी, अनधिकृत विक्री आणि वितरण, डोपिंगच्या उद्देशाने खेळाडूंना प्रतिबंधित पदार्थ पुरवणे, अल्पवयीन मुलांना प्रतिबंधित पदार्थांचा पुरवठा करणे, डोपिंगशी संबंधित संघटित गुन्हेगारी आणि व्यावसायिक कारवाया, विशिष्ट लेबलिंग शिवाय प्रतिबंधित पदार्थांची विक्री, आणि डोपिंगला प्रोत्साहन देणाऱ्या जाहिराती आणि सशुल्क प्रसिद्धी, यासारख्या कृत्यांना ‘गुन्हेगारी’ ठरवणे, हे प्रस्तावित सुधारणांचे उद्दिष्ट आहे.
डोपिंग नेटवर्कमध्ये सहभागी असलेले तस्कर, बेकायदेशीर पुरवठादार, संघटित टोळ्या आणि अप्रामाणिक सहाय्यक कर्मचाऱ्यांना लक्ष्य करणे, हे प्रस्तावित तरतुदींचे उद्दिष्ट आहे.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे, तस्करी, संघटित टोळी इत्यादींसारख्या प्रस्तावित गुन्हेगारी कृत्यांमध्ये सहभागी नसलेल्या खेळाडूंना केवळ उत्तेजक-विरोधी नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल अथवा उत्तेजक चाचणी सकारात्मक आल्याबद्दल गुन्हेगार ठरवले जाणार नाही.
प्रामाणिक खेळाडूंचे संरक्षण सुनिश्चित करणे, तसेच व्यावसायिक फायद्यासाठी क्रीडा क्षेत्र आणि खेळाडूंचे शोषण करणाऱ्या गुन्हेगारी नेटवर्कविरूद्ध अधिक कठोर कारवाई, हे प्रस्तावित सुधारणांचे उद्दिष्ट आहे.
या चौकटीत वैध उपचारात्मक वापर सूट (टीयूई) असलेल्या खेळाडूंना आणि खेळाडूंवर प्रतिबंधित पदार्थ/पद्धतींचा कायदेशीर वापर आवश्यक असलेल्या आपत्कालीन वैद्यकीय परिस्थितीत काम करणाऱ्या प्रामाणिक वैद्यकीय व्यावसायिकांना देखील संरक्षण प्रदान करण्यात आले आहे.
प्रस्तावित उपाययोजना युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन (युनेस्को) च्या 'क्रीडा क्षेत्रातील डोपिंग विरोधी' करारांतर्गत भारताने दिलेल्या वचनबद्धतेला अनुसरून आहेत, तसेच जागतिक डोपिंग विरोधी संस्थेचे (वाडा) समर्थन असलेल्या दृष्टिकोनाशी सुसंगत आहेत.
खेळाडूंचे संरक्षण, क्रीडा क्षेत्राची अखंडता, सार्वजनिक आरोग्य आणि प्रभावी अंमलबजावणी, यात समतोल साधणे, हे प्रस्तावित चौकटीचे उद्दिष्ट आहे.
सार्वजनिक सल्लामसलत प्रक्रियेदरम्यान प्रस्तावित सुधारणांवर लाभधारकांनी त्यांच्या टिप्पण्या आणि सूचना 18.06.2026 पर्यंत सादर कराव्यात असे आवाहन आहे.
सार्वजनिक विचारविनिमयासाठी प्रकाशित केलेल्या प्रस्तावित सुधारणांच्या मसुद्याची लिंक पुढे दिली आहे:
https://share.google/SXWL3HPDlLNF1FYBJ
https://share.google/WP8VceaSIfs8r3X8l
* * *
नितीन फुल्लुके/ राजश्री आगाशे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2263706)
अभ्यागत कक्ष : 23