पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी तिसऱ्या भारत-नॉर्डिक शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर आइसलँडच्या पंतप्रधानांची भेट घेतली
प्रविष्टि तिथि:
19 MAY 2026 8:03PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 मे 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्या भारत-नॉर्डिक शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर, ओस्लो येथे आइसलँडच्या पंतप्रधान क्रिस्टर्न फ्रॉस्टडॉटिर यांच्याबरोबर द्विपक्षीय बैठक घेतली.
पंतप्रधान फ्रॉस्टडॉटिर यांनी पदभार स्वीकारल्यापासून या दोन्ही नेत्यांमधील ही पहिलीच भेट होती. आइसलँडच्या इतिहासातील सर्वात युवा पंतप्रधान ठरल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी पंतप्रधान फ्रॉस्टडॉटिर यांचे अभिनंदन केले.
या बैठकीत दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासंदर्भात आणि विशेषतः लवकरच अंमलात येणाऱ्या भारत-युरोपियन मुक्त व्यापार संघटना, व्यापार आणि आर्थिक भागीदारी करारासंबंधी चर्चा केली.दोन्ही देशांमधील व्यापार, गुंतवणूक आणि उत्पादन क्षेत्रातील सहकार्य क्षमता पूर्णपणे उपयोगात येण्यासाठी टीईपीए करार ही एक उत्कृष्ट संधी असल्यावर दोन्ही नेत्यांचे एकमत झाले.
यावेळी दोन्ही नेत्यांनी भूऔष्णिक ऊर्जा, मत्स्यव्यवसाय, नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान, सर्जनशील अर्थव्यवस्था, संस्कृती, पर्यटन, गतिशीलता आणि दोन्ही देशांमधील नागरिकांचा परस्पर संपर्क, यासारख्या क्षेत्रांमधील द्विपक्षीय सहकार्याच्या प्रगतीचा आढावा घेतला आणि आर्क्टिक क्षेत्रातील संशोधनामध्ये सहकार्य वाढवण्यासंदर्भात चर्चाही केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आइसलँडच्या पंतप्रधानांना, दोन्ही देशांना सोयीस्कर होईल अशा वेळी भारताच्या भेटीवर येण्याचे निमंत्रण दिले.
* * *
निलिमा चितळे/राजेश शिरभाते/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2262999)
आगंतुक पटल : 46
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Tamil
,
Kannada
,
Manipuri
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Malayalam