ग्रामीण विकास मंत्रालय
ग्रामीण विकास मंत्रालयाने 'शी-मार्ट्स' च्या माध्यमातून देशभरात महिला संचलित ग्रामीण विपणन परिसंस्थेचा तयार केला आराखडा
Posted On:
18 MAY 2026 7:09PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 मे 2026
केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाने 'दीनदयाल अंत्योदय योजना-राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान' अंतर्गत, 14-15 मे 2026 रोजी ओदिशामध्ये भुवनेश्वर येथे 'शी-मार्ट्स' (SHE-MARTs –स्वयं सहाय्यता उद्योजक- ग्रामीण परिवर्तनासाठी विपणनाच्या संधी) या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन केले. या चर्चासत्रात ' अर्थसंकल्प घोषणा - 2026' च्या अंमलबजावणीचा मार्ग खुला झाला.
'शी-मार्ट' उपक्रमासाठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडून मिळालेले प्रत्यक्षातील पाहणीचे अभिप्राय, सूचना आणि संदर्भात्मक अंतर्दृष्टीच्या माध्यमातून परिचालनविषयक मार्गदर्शक तत्त्वांना अंतिम रूप देणे हा या चर्चासत्राचा उद्देश होता. यामध्ये संस्थात्मक रचना, वित्तपुरवठा मॉडेल्स, अभिसरण मार्ग, देखरेख प्रणाली, व्यावसायिक प्रक्रिया, प्रशासन रचना, तंत्रज्ञान एकत्रीकरण आणि अंमलबजावणी धोरण या प्रमुख विषयांचा समावेश होता.

केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव टी. के. अनिल कुमार यांनी आपल्या मुख्य भाषणात, उद्योग विकास आणि बाजारपेठ एकत्रीकरणामध्ये दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे भविष्य सामावलेले आहे, यावर भर दिला. शी-मार्ट्स हे अनुदानावर चालणारी संस्थात्मक मॉडेल्स म्हणून नव्हे तर महिला गटांच्या नेतृत्वाखालील समुदायांच्या-मालकीच्या किरकोळ आणि ऍग्रीगेशन प्रणाली म्हणून उदयाला आल्या पाहिजेत, असे त्यांनी अधोरेखित केले.
राज्ये/केंद्रशासित प्रदेश आराखड्याच्या मसुद्याची सखोल पडताळणी करू शकतील, अंमलबजावणीतील त्रुटी शोधू शकतील आणि या उपक्रमाची मोठ्या प्रमाणावर अंमलबजावणी करण्यासाठी व्यावहारिक पर्याय सुचवू शकतील, यासाठी एक सक्रीय व्यासपीठ उपलब्ध करणे हा या राष्ट्रीय चर्चासत्राचा उद्देश आहे, असे ग्रामीण विकास मंत्रालयाच्या संयुक्त सचिव स्वाती शर्मा यांनी स्पष्ट केले.
दीनदयाल अंत्योदय योजना-राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानाच्या ग्रामीण उपजीविका विभागाच्या संचालिका डॉ. मोलीश्री यांनी शी-मार्ट उपक्रमाची उत्क्रांती आणि धोरणात्मक दृष्टीकोन सादर केला आणि उपजीविका वाढवण्याकडून उद्योग-प्रणीत ग्रामीण बाजार प्रणालीकडे जाण्याच्या गरजेवर भर दिला.

शी-मार्ट्सला अनुदानावरअवलंबून असणारे किरकोळ विक्रीकेंद्र बनवण्याऐवजी, ते विकेंद्रित, महिला संचालित, व्यावसायिकरित्या व्यवस्थापित आणि समुदायांच्या-मालकीची उद्योग परिसंस्था बनवण्यावर या दोन दिवसीय चर्चासत्रात, सर्वांनी सहमती व्यक्त केली.
राज्ये/केंद्रशासित प्रदेश, दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि परिसंस्थेतील भागीदारांकडून शी-मार्ट्ससाठीच्या अंतिम मार्गदर्शक तत्त्वांना बळकट करण्याच्या आणि देशभरात टप्प्याटप्प्याने त्याच्या अंमलबजावणीला पाठिंबा देण्याच्या सामायिक वचनबद्धतेसह या बैठकीचा समारोप झाला. देशभरातील महिला संचलित उत्पादक समूहांसाठी उत्पन्नाच्या संधी, उद्योग वृद्धी, ब्रँडिंग आणि बाजारपेठेतील प्रवेश वाढवता यावा, यासाठी ग्रामीण विकास मंत्रालयाने 2029 पर्यंत आणखी 3 कोटी 'लखपती दीदी' तयार करण्याच्या आणि राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांना शी-मार्ट्स हे शाश्वत ग्रामीण विपणन व्यासपीठ म्हणून स्थापित करण्यासाठी सहकार्य करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.
* * *
निलिमा चितळे/शैलेश पाटील/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2262472)
अभ्यागत कक्ष : 14