वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

जी-ई-एम (GeM) पोर्टल कार्यालयाने साजरा केला स्थापना दिवस 2026; भारतातील डिजिटल सार्वजनिक खरेदी प्रणालीला सातत्याने पाठबळ देण्याचा प्रयत्न

Posted On: 16 MAY 2026 2:03PM by PIB Mumbai

 

सरकारच्या जीईएम म्हणजेच ई-बाजारपेठ पोर्टलचा स्थापना दिन आज साजरा करण्यात आला. भारतात, सार्वजनिक खरेदी करतांना, पारदर्शकता, कार्यक्षमता आणि तंत्रज्ञान-प्रणित प्रशासनाला चालना देण्याच्या सातत्यपूर्ण प्रयत्नाची सुरुवात म्हणून या दिवसाचे महत्त्व आहे.

केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयांतर्गत गवर्नमेंट ई मार्केटप्लेस ही संस्था, स्पेशल पर्पज व्हेईकल म्हणून, कलम 8 अंतर्गत नोंदणीकृत ना-नफा कंपनी 17 मे 2017 रोजी कंपनी कायदा, 2013 अंतर्गत स्थापन करण्यात आली. जी-ई-एम प्लॅटफॉर्मचा विकास, व्यवस्थापन आणि देखभाल करण्यासाठी या संस्थेची स्थापना करण्यात आली होती.

गेल्या काही वर्षांत जी-ई-एम  हे एक महत्त्वाचे डिजिटल सार्वजनिक खरेदी व्यासपीठ म्हणून उदयास आले असून, व्यवसाय सुलभता वाढवणे आणि देशभरातील विक्रेत्यांना व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून देणे यात, या व्यवस्थेचे महत्वाचे योगदान आहे.

आत्मनिर्भर भारत व्होकल फॉर लोकल आणि विकसित भारत 2047 च्या दृष्टिकोनाशी सुसंगत, अशा या प्रणालीमुळे, देशांतर्गत अस्थापनांना चालना मिळाली आहे. यामुळे स्थानिक उद्योगांना सरकारच्या विविध वस्तूंच्या मागण्यानुसार आपल्या उत्पादनांची विक्री करण्याची संधी मिळाली आहे. या मंचावर श्रेणी- 1 चे स्थानिक पुरवठादार जसे की औषधनिर्माण कंपन्या, वाहतूक कंपन्या, बांधकाम साहित्य, फर्निचर, वस्त्रे आणि वैद्यकीय साधने, अशा कंपन्या सहभागी आहेत.

आज या मंचावर 1.36 लाखांपेक्षा अधिक सरकारी खरेदीदार आणि सुमारे 25 लाख विक्रेते आणि सेवा पुरवठादार आहेत. त्यातील सुमारे 72% सक्रिय विक्रेते, सूक्ष्म आणि लघु उद्योग कंपन्यांचे आहेत.

आर्थिक वर्ष  2025-26 मध्ये 11 जास्त एमएसई आस्थापनांना, जी-ई-एम पोर्टलवर 2.36 लाख कोटी रुपयांच्या 51 लाखांपेक्षा अधिक ऑर्डर्स मिळाल्या.

महिलांच्या नेतृत्वाखालील सूक्ष्म आणि लघु उद्योगांना 28,000 कोटी रूपयांपेक्षा अधिक किमतीच्या खरेदीच्या ऑर्डर्स मिळाल्या. तर अनुसूचित जाती/जमातीच्या उद्योजकांना 6,000 कोटी रूपयांपेक्षा अधिक किमतीच्या ऑर्डर्स मिळाल्या. त्याशिवाय, या प्लॅटफॉर्मवरच्या स्टार्टअप्सना 19,000 कोटी रूपयांपेक्षा अधिक किमतीच्या मालाच्या ऑर्डर्स मिळाल्या. यातून उद्योजकतेला प्रोत्साहन देणे आणि सरकारी खरेदी प्रक्रियेत व्यापक संधी उपलब्ध करून देण्यात जी-ई -एम ची महत्वाची भूमिका अधोरेखित होते.

 “सरकार आणि त्याच्या संस्थांसाठी पारदर्शक, कार्यक्षम आणि सर्वसमावेशक डिजिटल खरेदी व्यासपीठ उभारण्याच्या दृष्टीकोनातून जी-ई-एम ची स्थापना करण्यात आली होती, आज ही प्रणाली देशांतर्गत उद्योगांना खरेदीच्या संधींशी जोडून आत्मनिर्भर भारत आणि ‘व्होकल फॉर लोकल’ उपक्रमांना सातत्याने बळकटी देत आहे.” असे मत, जी-ई-एमचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिहिर कुमार यांनी व्यक्त केले आहे.

स्थापना दिनाच्या कार्यक्रमाचा भाग म्हणून, जी-ई-एम ने सर्व भागधारकांचा सहभाग असलेल्या बैठका आणि परस्पर ज्ञान सामाईक करण्याचे उपक्रम आयोजित केले आहेत. या समारंभाची सुरुवतात, 15 मे रोजी जी-ई-एम ने घेतलेल्या विक्रेते मूल्यमापन कार्यशाळेने झाली असून, पुढच्या, ओईएम साठी विक्रेता मूल्यमापन प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रांबाबत अधिक स्पष्टता निर्माण करणे हा त्यामागचा उद्देश आहे.

याशिवाय, जी-ई-एम तर्फे 21 मे 2026 रोजी “जी-ई-एम मार्केटप्लेस अधिक समृद्ध करणे” या विषयाअंतर्गत मंथन चे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाद्वारे जीईएम व्यवस्था अधिक सक्षम करण्याबाबत चर्चा होण्याची अपेक्षा आहे. तसेच, 22 मे 2026 रोजी संरक्षण सेवांच्या प्रतिनिधींसोबत एक विचारमंथन सत्र आयोजित करण्यात येणार असून, संरक्षण खरेदी प्रक्रिया आणि संरक्षण विभागाच्या गरजांशी अधिक सुसंगत होण्यासाठी प्रक्रियेत अपेक्षित सुधारणा आणि तांत्रिक सहाय्याविषयी चर्चा केली जाणार आहे.

***

माधुरी पांगे/राधिका अघोर/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2261754) अभ्यागत कक्ष : 14