महिला आणि बालविकास मंत्रालय
केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी, श्रीलंकेच्या महिला व बाल व्यवहार मंत्री सरोजा सावित्री पॉलराज आणि श्रीलंकेच्या महिला संसद सदस्यांच्या गटाची घेतली भेट
महिलांना केवळ कल्याणकारी योजनांचे लाभार्थी न मानता, राष्ट्रीय विकासाचे सक्रिय घटक म्हणून पाहण्याचा भारताचा दृष्टिकोन - अन्नपूर्णा देवी
परस्पर सामायिक हिताच्या क्षेत्रांवर उभय देशांची चर्चा; संस्थात्मक संबंध अधिक दृढ करण्यासाठी बांधिलकी व्यक्त
Posted On:
13 MAY 2026 6:08PM by PIB Mumbai
महिला आणि बाल विकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी आज नवी दिल्लीतील जीपीओए (GPOA), ब्लॉक 3 येथील मंत्रालयाच्या कॉन्फरन्स रूममध्ये श्रीलंकेच्या महिला आणि बाल व्यवहार मंत्री सरोजा सावित्री पॉलराज आणि श्रीलंकेच्या महिला संसद सदस्यांच्या सत्ताधारी गटाची (Women Parliamentarians Caucus) भेट घेतली.

श्रीलंकेच्या महिला संसद सदस्यांच्या सत्ताधारी गटाचा हा भारत दौरा, श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष अनुरा कुमारा दिसानायके यांची डिसेंबर 2024 मध्ये भारत भेटीदरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या चर्चेचा एक भाग आहे.
'महिलांच्या नेतृत्वाखालील विकासा'साठी भारताने घेतलेल्या प्रमुख पुढाकारांची माहिती या बैठकीत श्रीलंकेच्या शिष्टमंडळाला देण्यात आली. भारत महिलांना केवळ कल्याणाचे लाभार्थी मानत नाही, तर त्यांना राष्ट्रीय विकासाचे सक्रिय घटक मानतो, असे मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी अधोरेखित केले. महिला सक्षमीकरणासाठी भारताच्या वैधानिक, धोरणात्मक आणि संस्थात्मक कटिबद्धतेचा त्यांनी उल्लेख केला.

दोन्ही देशांनी समान हिताच्या विषयांवर सविस्तर चर्चा केली आणि दोन्ही मंत्रालयांमधील संस्थात्मक संबंध अधिक दृढ करण्याचा निर्धार व्यक्त केला.

या बैठकीचा समारोप श्रीलंकेच्या शिष्टमंडळाला स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आला आणि त्यानंतर सामूहिक छायाचित्र घेण्यात आले.
***
शैलेश पाटील/वैभवी जोशी/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2260834)
अभ्यागत कक्ष : 10