नौवहन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

तूतुकुडी येथे भारताच्या पहिल्या मेगा ग्रीनफील्ड शिपयार्डसाठी ऐतिहासिक सामंजस्य करारावर स्वाक्षरी

Posted On: 13 MAY 2026 4:57PM by PIB Mumbai

 

भारताच्या सागरी क्षेत्रासाठी एका  ऐतिहासिक घडामोडीत,   20 एप्रिल 2026  रोजी, जहाजबांधणी क्षेत्रातील जागतिक अग्रणी कंपनी एचडी कोरिया शिपबिल्डिंग अँड ऑफशोअर इंजिनिअरिंग कंपनी लिमिटेड (एचडी केएसओई); भारत सरकारचे प्रमुख बंदर असलेल्या व्ही.ओ. चिदंबरनार पोर्ट अथॉरिटी (व्हीओसीपीए) आणि तामिळनाडू सरकारचा उपक्रम असलेल्या स्टेट इंडस्ट्रीज प्रमोशन कॉर्पोरेशन ऑफ तामिळनाडू (सिपकॉट) तामिळनाडू यांनी संयुक्तपणे प्रवर्तित केलेले विशेष उद्देश उपक्रम  (स्पेशल पर्पज व्हेईकल) नॅशनल शिपबिल्डिंग अँड हेवी इंडस्ट्रीज पार्क, तामिळनाडू लिमिटेड (एनएसएचआयपी-टीएन); आणि बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाच्या अंतर्गत असलेली सागरमाला फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (एसएमएफसीएल) यांच्यात, तामिळनाडूच्या तूतुकुडी येथे भारताच्या पहिल्या मेगा ग्रीनफील्ड शिपयार्डच्या विकासासाठी त्रिपक्षीय सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली.

कोरियाचे अध्यक्ष महामहिम  ली जे म्युंग यांच्या भारत दौऱ्यादरम्यान, 20 एप्रिल 2026 रोजी बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्र्यांच्या सन्माननीय उपस्थितीत या सामंजस्य कराराची देवाणघेवाण करण्यात आली.

तुतुकुडी ग्रीनफील्ड शिपयार्ड हे भारत-कोरिया सागरी सहकार्य चौकटीअंतर्गत सर्वात सुरुवातीच्या अंमलबजावणी फलश्रुतीपैकी एक आहे आणि सागरी क्षेत्रात दोन्ही देशांमधील वाढत्या धोरणात्मक भागीदारीचे ते द्योतक आहे.

हा सामंजस्य करार, तुतीकुडी येथे 2.5 दशलक्ष ग्रॉस टन  वार्षिक क्षमतेच्या जागतिक दर्जाच्या मेगा शिपयार्डच्या संयुक्त विकास, वित्तपुरवठा, बांधकाम आणि परिचालनासाठी आधार  प्रदान करतो. या प्रकल्पाअंतर्गत परिचालन  स्थिर झाल्यावर अंदाजे 15,000 प्रत्यक्ष रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा असून  संपूर्ण तामिळनाडू आणि आसपासच्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होतील.

2.5  दशलक्ष जीटीच्या अंदाजित वार्षिक क्षमतेसह प्रस्तावित तुतीकुडी प्रकल्पामुळे भारताच्या व्यावसायिक जहाजबांधणी क्षेत्रात मोठे परिवर्तन घडून येईल आणि देशाच्या सध्याच्या जहाजबांधणी क्षमतेत लक्षणीय वाढ होण्याची  अपेक्षा आहे.

या सहकार्यामुळे कोरियामधील एचडी केएसओईच्या सुविधांमध्ये भारतीय जहाजबांधणी व्यावसायिक आणि कामगारांना प्रशिक्षण मिळणेही  सुलभ होईल.

या प्रसंगी बोलताना, केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल म्हणाले: “हा ऐतिहासिक सामंजस्य करार पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली जागतिक सागरी शक्ती बनण्याच्या आपल्या प्रवासातील हा एक महत्त्वपूर्ण क्षण आहे. यामुळे केवळ भारताच्या व्यावसायिक जहाजबांधणी क्षमतेत परिवर्तन होणार नाही, तर हजारो कुशल रोजगाराच्या संधी निर्माण होतील, औद्योगिक विकासाला चालना मिळेल आणि जागतिक स्पर्धात्मकतेसह आपली सागरी परिसंस्था अधिक मजबूत होईल.”

 

 

***

निलिमा चितळे/सुषमा काणे/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2260797) अभ्यागत कक्ष : 8