इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

इंडियाएआय मिशन आणि राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने एबी पीएम-जेएवाय ऑटो-ऍडज्युडिकेशन हॅकेथॉन शोकेस 2026 च्या विजेत्यांचा केला सन्मान


आयआयएससी बंगळूरु येथे आरोग्य विमा दाव्यांच्या व्यवस्थापनासाठी एआय उपाय शोधणाऱ्या नऊ नवोन्मेषकांचा गौरव

Posted On: 13 MAY 2026 2:11PM by PIB Mumbai

 

इंडियाएआय मिशनने, राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण (एनएचए) आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (आय.आय.एस.सी.), बंगळूरू यांच्या सहयोगाने, 9 मे 2026 रोजी आय.आय.एस.सी बंगळूरू येथे 'एबी पीएम-जेएवाय ऑटो-ॲडज्युडिकेशन हॅकेथॉन शोकेस 2026’ च्या विजेत्यांचा सत्कार केला. सार्वजनिक आरोग्य विम्यामध्ये एआय आधारित नाविन्यपूर्ण प्रयोगांच्या दोन दिवसीय राष्ट्रीय प्रदर्शनाचा या कार्यक्रमाने समारोप झाला.

एनएचए आणि आयआयएससी बंगळूरु यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या हॅकेथॉनमध्ये, दाव्यांवरील निर्णयात गती, पारदर्शकता आणि अचूकता सुधारण्यासाठी उपाय विकसित करण्यावर, तसेच फसवणूक शोधण्याची क्षमता अधिक मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले.

राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील कुमार बर्नवाल, राष्ट्रीय चाचणी संस्थेचे महासंचालक अभिषेक सिंह, राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या सहसचिव ज्योती यादव आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या सहसंचालक शिखा दहिया यांनी, दाव्यांच्या ए-आय आधारित निर्णय  प्रक्रियेत परिवर्तन घडवून आणण्याची क्षमता असलेले उपाय सादर करणाऱ्या नवोन्मेषकांचा सत्कार केला.

जगातील सर्वात मोठ्या सार्वजनिक अर्थसहाय्य असलेल्या आरोग्य विमा योजनांपैकी एक असलेल्या 'आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत, दाव्यांच्या निराकरणासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या तीन प्रमुख समस्यांवर या हॅकेथॉनमध्ये उपाय मागवण्यात आले होते. एबी पीएम- जेएवाय अंतर्गत 1,900 हून अधिक उपचार पॅकेजेससाठी दररोज मोठ्या संख्येने दाव्यांवर प्रक्रिया केली जाते.

हॅकेथॉन विजेते

समस्या विधान 1: आरोग्य दस्तऐवज वर्गीकरण आणि एसटीजी अनुपालन

वेगवेगळ्या गुणवत्तेच्या आरोग्यसेवा दस्तऐवजांचे स्वयंचलितपणे वाचन करणे, त्यामधून महत्त्वाचा डेटा काढणे, अनिवार्य दृश्य घटक शोधणे आणि एनएचए ने दिलेल्या मानक उपचार मार्गदर्शक तत्त्वांचे (एसटीजी) पालन तपासणे.

· विजेता : विनय बाबू उल्ली

· उपविजेता: खुशी सिंह

· द्वितीय उपविजेता: विजय बालाजी

 

समस्या विधान 2: रेडिओलॉजिकल इमेज-आधारित आजार तपासणी आणि अहवाल सुसंगती  

एसटीजी अंतर्गत पुरावा म्हणून सादर केलेल्या एक्स-रे, सीटी स्कॅन आणि एमआरआय यांसारख्या प्रतिमा-आधारित तपासण्या प्रमाणित करणे, दाव्यांवर अचूक आणि कार्यक्षमतेने निर्णय देण्यासाठी त्यांची अहवालांबरोबर सुसंगती तपासणे.

· विजेता: हरीश कुमार

· उपविजेता: भरत वर्मा संगराजू

· द्वितीय उपविजेता:  अरनॉल्ड सचित

  

समस्या विधान 3: बनावट कागदपत्र आणि डीपफेक शोध

दावा सादर करण्याच्या वेळी बनावट किंवा कृत्रिमरित्या तयार केलेल्या कागदपत्रांचा शोध घेणे, यात फेरफार केलेले डिस्चार्ज कागदपत्र , फेरफार केलेली बिले, बनावट ओळख आणि एआयचा वापर करून समाविष्ट केलेले चुकीचे घटक  याचा समावेश आहे.

· विजेता : प्रवीण श्रीधर

· उपविजेता : निखिलेश्वर राव सुलके

· द्वितीय उपविजेता: सुमंत नायडू मथिरेड्डी

विजेत्या संघांना अनुक्रमे 5 लाख, 3 लाख आणि 2 लाख रुपये रोख पारितोषिक देण्यात आले. निवडक उपायांचा भविष्यात एबी पीएम-जेएवाय परिसंस्थेत समावेश करण्याचा विचार केला जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

***

निलिमा चितळे/राजश्री आगाशे/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2260739) अभ्यागत कक्ष : 7